Site icon

Government Employees : आनंदाची बातमी!! सरकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हे निर्णय मंजूर

Government Employees : आनंदाची बातमी!! सरकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हे निर्णय मंजूर

Government Employees : केंद्र सरकारकडून जवळपास 50 लाख कर्मचारी आणि 60 लाख निवृत्ती वेतन घेणारे कर्मचारी यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणजेच DA आणि DR मध्ये 3 टक्क्यांची वाढ केली गेली आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. (DA Hike) कर्मचाऱ्यांना आता ऐकून 53% तर निवृत्तीवेतन घेणाऱ्यांना तेवढीच महागाई सवलत दिली जाणार आहे. नवीन डीए दरवाढ ही जुलैपासून लागू होईल.

सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50% हुन 53% होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पगारामध्ये तीन महिन्याचा जास्तीचा DA सुद्धा दिला जाईल म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी सुद्धा ऑक्टोबर मध्ये दिली जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एन्ट्री रिव्हर कर्मचाऱ्यांचा पगार :

या वाढलेल्या महागाई भत्त्यामुळे एन्ट्री लेवल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ज्यांचे मूळ वेतन महिन्याला अंदाजे 18 हजार रुपये होते त्यांच्या पगारांमध्ये आता दर महिन्याला 540 रुपयांनी वाढ होणार आहे. या निर्णयामुळे 1 कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतन घेणाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

DA आणि DR मध्ये वाढीसाठी उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला केंद्रीय कर्मचारी महासंघाने एक पत्र पाठवले होते. त्या पत्रामध्ये DA आणि DR वाढीसाठी उशीर झाला म्हणून नाराजी व्यक्त केली गेली होती. महासंघाचे सरचिटणीस एसबी यादव यांनी त्या पत्रात असे म्हटले होते की DA आणि DR मध्ये वाढ होण्यास उशीर होत असल्यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन घेणाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळेच दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर पी एल बी (परफॉर्मर्स लिंक बोनस) आणि तात्पुरता बोनस ही लवकर जाहीर केला जावा अशी मागणी केली गेली होती.

महागाई भत्ता म्हणजे काय :

DA वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जी महागाईची झळ बसते त्यापासून त्यांना दिलासा मिळतो. महागाई वाढत असताना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवन हे समतोल राखण्यासाठी हा पैसा दिला जातो. हे पैसे सरकारी कर्मचारी, सर्व क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्ती वेतन घेणारे कर्मचारी यांना दिला जातो. आताच्या महागाई प्रमाणे दर सहा महिन्यांनी महागाई भत्यात वाढ केली जाते. तसेच संबंधित वेतनश्रेणी वर आधारित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्याची गणना केली जाते. शहरी निम शहरी किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळा महागाई भत्ता असू शकतो.

वाढीव महागाई भत्यानुसार पगार किती असेल :

डी वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे सध्या तीन टक्के मागणी पत्र त्यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये पगार असेल तर त्यामध्ये 3 टक्के वाढीनुसार त्यांना अतिरिक्त 3000 रुपये मिळतील.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय रब्बी पिकांचे MSP वाढवले :

केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यास 0 मंजुरी दिली गेली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गव्हाच्या MSP मध्ये प्रतिक्विंटल 150 रुपयांची वाढ केली गेली असून ती आता 2275 वरून 2425 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मोहरीचे भाव 300 रुपयांनी वाढले असून त्याचा प्रतिक्विंटल भव 5950 रुपये आणि हरभऱ्याची MSP 210 रुपयांनी वाढवून 5650 रुपये प्रति क्विंटल केली गेली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने 2025 – 26 च्या रब्बी हंगामासाठी 6 आवश्यक पिकांच्या MSP मध्ये 130 ते 300 रुपये प्रति क्विंटल च्या पटीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र झारखंड आणि दिल्ली या महत्त्वाच्या राज्यातील निवडणुकांमुळे पिकांच्या एमसी मध्ये वाढ केलेली आहे. एप्रिल 2025 पासून रब्बी मार्केट हंगाम सुरू होणार आहे. मंत्रिमंडळातर्फे हा घेण्यात आलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच आहे. खरीप हंगामाप्रमाणे रब्बी पिकांसाठी सुद्धा मोठी वाढ केली गेली आहे असे वैष्णव यांनी सांगितले.

मंत्रिमंडळातर्फे केल्या गेलेल्या घोषणेप्रमाणे 2025 – 26 साठी गव्हाची किंमत 2425 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे जी मागील वर्षी 2275 रुपये क्विंटल होती.

यासोबत केंद्र सरकारने आणखी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले :

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये कोस्टल शिपिंगसाठी सुद्धा मंजुरी दिली गेली आहे. कोस्टल शिपिंग बिल 2024 यानुसार किनारपट्टी भागांना कसा फायदा होईल याची सुद्धा घोषणा कॅबिनेट मध्ये करण्यात आली आहे. तेलबियाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी 2025 – 26 च्या हंगामासाठी मोहरी बियांच्या मूल्यांमध्ये 300 ते 5960 वाढ करण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. करईच्या दरात सुद्धा 140 ते 5940 रुपये प्रति क्विंटल ने वाढ केली गेली आहे. जी मागील वर्षी 5800 रुपये प्रति क्विंटर होती. कडधान्यांसाठी मसूर या कडधान्यासाठी 275 किंमत ही आधारभूत किंमत वाढवत 6700 प्रति क्विंटल करण्यात आली आहे. 2025 – 26 च्या हंगामासाठी हरभऱ्याची किंमत 210 रुपये वाढवून 5650 प्रति क्विंटल केली आहे. बार्लीच्या हंगामासाठी बार्लीच्या किंमतीचत 130 रुपये प्रति क्विंटल ते 1980 प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. जी मागील वर्षी 1850 रुपये प्रति क्विंटल होती.

Exit mobile version