Site icon

Subhadra Yojna: आनंदाची बातमी! महिलांसाठी या सरकारने सुरू केली नवीन योजना. बँक खात्यात येणार 50000 रुपये. काय आहे नेमकी योजना? कोणत्या महिला पात्र?

आनंदाची बातमी! महिलांसाठी या सरकारने सुरू केली नवीन योजना. बँक खात्यात येणार 50000 रुपये. काय आहे नेमकी योजना? कोणत्या महिला पात्र?

Subhadra Yojna News: महिलांच्या सक्षमीकरणासाठी (Financial Empowerment Of Women) सरकार विविध प्रकारच्या (Various Plan) योजना आणत आहे. महिलांना आर्थिक पाठबळ या योजनांच्या मार्फत विविध राज्यांमधील सरकार देत आहे. अशातच ओडिशा सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेच्या मार्फत महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचे नाव आहे (Subhadra Yojna) सुभद्रा योजना. या योजनेबद्दल आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. यामध्ये अनेक योजना महिलांना थेट आर्थिक लाभ देण्याकरिता आणल्या गेल्या आहेत. केंद्र सरकारचं नाही तर भारतातील सर्व राज्यातील राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत. त्यातच ओडिशा सरकारने त्यांच्या राज्यातील महिलांसाठी सुभद्रा योजना जाहीर केली आहे. या योजने मार्फत महिलांना 50000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी नेमका अर्ज कसा करावा? त्यासाठी कोणकोणत्या पात्रता राहतील? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

कोणत्या महिलांना मिळणार 50000 हजार रुपये??

subhdrayojana: ओडिशा सरकारने सुरू केलेल्या सुभद्रा योजनेचे महिलांना 50000 रुपये दिले जातील. ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेमार्फत महिलांना दर वर्षाला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. सरकारच्या या योजनेत महिलांना प्रत्येकी 5000 रुपये दोन हप्त्यामध्ये दिले जातील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी महिलांना 2008 – 29 पर्यंत म्हणजेच पुढील पाच वर्षात एकूण 50000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत ओडिशा राज्यातील एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्य सरकारने 55825 कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे. या पैशामुळे महिला आपला उदरनिर्वाह, आपला व्यवसाय करू शकणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिन व दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवशी 17 सप्टेंबर ला या योजनेचा शुभारंभ करणार आहेत

या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सुभद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्ष असावे.

लाभ घेणारी महिलाही मूळची ओडीशा राज्यातील असणे अनिवार्य राहील.

ज्या महिलांच्या कुटुंबात कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल अशा कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

60 वर्षाच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या महिलांच्या घरात राहणाऱ्या व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असतील अशा महिलांना देखील या योजनेला मिळणार नाही.

एखादी महिला जर राज्याच्या कोणत्याही योजनेचा या आधीच लाभ घेत असेल तर त्या महिलेला देखील सुभद्रा या योजनेचा मिळणार नाही.

कोणत्या महिला पात्र ठरतील

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्य अन्न सुरक्षा योजना (SFSS) मध्ये त्या महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये असावे.

कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी पात्र होण्याचे वय अर्जदार महिलेचे 21 ते 60 वर्ष असावे.

                                               हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी!!! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारने केली भरघोस वाढ

सुभद्रा योजना कधीपासून सुरू होणार आहे?

ओडीशा सरकार तर्फे सुरू करण्यात आलेली सुभद्रा योजना ही 17 सप्टेंबर 2024 पासून संपूर्ण राज्यात सुरू होणार आहे. या योजनेमार्फत राज्य सरकार सर्व महिलांना प्रत्येकी 5000 रुपये वर्षातून दोन वेळा म्हणजेच दहा हजार रुपये देणार आहे. पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त व दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्त महिलांच्या बँक खात्यावर पाठवला जाईल.

या योजनेसाठी ही कागदपत्र अनिवार्य?

आधार कार्ड (ओळख पटवण्यासाठी )

पासपोर्ट आकाराचा फोटो

जन्म दाखला (अर्ज करणाऱ्या महिलेच्या वयाची पुष्टी करण्यासाठी)

बँक खाते पासबुक
(पत्त्याचा पुरावा ओडिशा राज्यातील निवासस्थानाची पुष्टी करण्यासाठी)

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास सामाजिक सेवेचे तपशील देण्यासाठी)

मोबाईल क्रमांक व ई-मेल

सुभद्रा योजना या प्रकारे काम करेल??

लाभार्थी पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे अनिवार्य राहील. ज्या महिला या अटी पूर्ण करतील अशांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. सुभद्रा डेबिट कार्ड देखील पात्र लाभार्थी महिलांना मिळणार आहेत. आर्थिक दृष्ट्या सक्षम महिला, सरकारी कर्मचारी महिला आणि कर्ज त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. बँक, पोस्ट ऑफिस या ठिकाणी नोंदणीसाठी महिलांची गर्दी होत आहे तसेच या योजनेसाठी आधार कार्ड अपडेट करण्यात आलं आहे. या योजनेची नोंदणी करण्याची कुठली शेवटची तारीख दिली नाही. मात्र पात्र महिलांची नोंदणी होत नाही तोपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे.

लोकसभेच्या निवडणुक निकालानंतर भाजप सरकारने सुभद्रा ही योजना आणली आहे. बीजू जनता दलाची सत्ता मिळाल्यासाठी ही योजना भाजपाने आणली अशी चर्चा आहे. बीजू जनता दलाच्या कार्यक्रमाला आव्हान देण्यासाठी योजना आणण्यात आली आहे त्यामुळेच या खास योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदींच्या हस्ते केला जाणार आहे. ही योजना 2029 पर्यंत सुरू राहणार आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

Exit mobile version