Ladki Bahin Yojana Last Date Extended : आनंदाची बातमी!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!! शेवटची तारीख? अर्ज कुठे आणि कधीपर्यंत भरता येईल?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत जवळपास 2 कोटी 30 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण पाच महिन्यांचे पैसे सरकारकडून जमा केले गेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला भगिनींसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana Last Date Extended) महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्याची मुदत आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणून आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतसाठी अर्ज केलेले नसतील त्या महिलांना आता त्यांचे अर्ज करता येणार आहेत.
सर्व महिलांना सांगण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे. परंतु हे अर्ज फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांच्यामार्फतच भरले जातील. अशा सूचना शासनाकडून मिळालेल्या आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. लाडक्या बहिणींना, महिलांना आता नवीन अर्ज करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसात अर्ज करून या योजनेचा महिलांना लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत जवळपास 2 कोटी 30 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये पाच महिन्याचे पैसे सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत.
हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇
तुमच्या मुलींच्या खात्यात सरकार जमा करत आहे पाच हजार रुपये! लाडकी बहीण योजनेनंतर आली नवीन योजना! या ठिकाणी बघा अर्ज प्रक्रिया?
महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी लाडकी बहिणी या योजनेला मिळत असलेला मोठा प्रतिसाद पाहून सरकारने याआधी 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दिली होती. परंतु गेल्या महिन्यात अनेक महिलांनी आपले अर्ज सादर करता आले नाही काहींनी अर्ज सादर केले होते. ज्या ज्या महिलांनी अर्ज सादर केले त्या त्या महिलांना या योजनेचा लाभ ही मिळाला आहे. रक्षाबंधन या सणाचा मुहूर्त पाहून महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्याची सुरुवात केली. तेव्हाच पासून आजपर्यंत जवळपास 2 कोटी 30 लाख लाडक्या बहिणी या योजनेत पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या बँक खात्यांवर पैसे सुद्धा जमा झाले आहेत. बऱ्याच महिलांच्या बँक खात्यात जवळपास 5 हप्ते म्हणजे 7500 हजार रुपये जमा झालेले आहेत. आता उरलेल्या महिलांनाही, लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेसाठी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. परंतु अर्ज फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. महायुती सरकारने या योजनेची सुरुवात जेव्हा केली तेव्हापासून अनेक वेळेस अर्ज करण्याची मुदती वाढवून दिली आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागणार असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनाचे अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या योजनेचे पैसे वाढवण्याबद्दल रायगड मध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलले आहेत. लाडकी बहीण योजनेमार्फत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत आहोत. तसेच शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल, तरुणांसाठी युवक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आम्ही तरुणांना सहा ते सात हजार रुपये, मोफत शिक्षण व उच्च शिक्षण राज्य सरकारकडून दिले जात आहे. तरीही लाडकी बहिण ही योजना बंद होणार नाही असे शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली आहे यापुढे पंधराशे रुपयेचे दोन किंवा अडीच हजार रुपये नक्की करू त्यावेळेस हात आखडता घेतला जाणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावेळेस पआदिती तटकरे देखील उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :
१ ) या योजनेच्या लाभासाठी ऑफलाइन अर्ज केलेला असावा.
२ ) आधार कार्ड
३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला आणि हे उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणती कागदपत्र
४) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत)
५) पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखविण्याची गरज नाही.
६) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
७) पासपोर्ट साईजचा फोटो
८) रेशन कार्ड
९) या योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याचे हमीपत्र
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अटी व शर्ती :
१) अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
२) राज्यातील विवाहित घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करू शकणार आहेत.
३) आधी लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्ष होता नवीन नियमानुसार तो आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
४) लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक राहील.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असावे.
किती वेळा वाढवली मुदत :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सर्वात आधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती व त्यानंतर अर्ज करण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2024 केली होती. त्यानंतर परत एकदा ही मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2024 केली गेली आणि आता परत तिसऱ्यांदा ही मुदत वाढवली गेली आहे आणि ती 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे.