जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 लिपिक आणि शिपाई या पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी प्रसिद्ध झाली जाहिरात. District Central Co-operative Bank Bharti 2024
District Central Co-operative Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या सर्व पात्र उमेदवारांकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक या पदासाठी 261 जागा व शिपाई या पदासाठी 97 जागा ऑनलाईन पद्धतीने सरळ सेवा भरती करण्यासाठी व निवड सूची तयार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही दहावी व बारावी आणि पदवी धर विद्यार्थ्यांना अतिशय मोठी आणि चांगली संधी आलेली आहे. बँक भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली जाहिरात पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीची सर्व PDF आणि अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक खाली दिलेली आहे.
PDF जाहिरात : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
पदाचे नाव : लिपिक व शिपाई
एकूण पदसंख्या : 358 जागा भरण्यात येतील
शैक्षणिक अहर्ता : दहावी/बारावी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य राहील.
नोकरीचा कालावधी : कायमची नोकरी.
वयाची अट : 18 ते 45 वर्ष सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
लिपिक : (Clerk) कोणत्याही शाखेचा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर आणि MS-CIT समतुल्य किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे.वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदवीधर, पदवी व बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ, लिपिक पदाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य राहील. (Clerk Vacancy) तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग व लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
शिपाई : (Peon) किमान इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य राहील. (Peon vacancy)
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
मुलाखत : कागदपत्र पडताळणी नंतर मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांनी बँकेने ठरवलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. मुलाखत 10 गुणांची असेल. उमेदवार मुलाखतीस गैरहजार राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. लिपिक पदाची मुलाखत 10 गुणांची राहील.
उमेदवाराने नोकरीसाठी केलेल्या अर्जामध्ये केलेली माहिती अंतिम समजण्यात येईल.
ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व कागदपत्र घेऊन वेळेत हजर राहणे बंधनकारक राहिली. यासाठी मुदत वाढ दिली जाणार नाही. कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वतःच्या खर्चाने यावे लागेल.
भरती प्रक्रिया निवड कार्यपद्धतीत बदल करण्या हा अधिकार बँकेस राहील व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरूपात कळवले जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र परीक्षार्थींची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार इतर शहरातील केंद्रांवरील परीक्षा घेतली जाईल.
उमेदवारास मराठी, इंग्रजीचे या भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य राहील.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना कागदपत्रे सादर करायची नसली तरी या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक अहर्ता प्राप्त असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा.
उमेदवारांनी त्यांचा अर्ज बँकेच्या संकेतस्थळावरून स्वतःच्या माहितीसाठी डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील.
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःची माहिती पूर्ण माहिती अचूक भरावी.
उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्र पुरावे जोडणे आवश्यक राहणार नाही.
रिक्त पदांची संख्या कमी जास्त झाल्यास कोणत्याही कारणास्तव रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध झालेल्या निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतिक्षा यादीतील उमेदवाराकडून रिक्त पद भरण्यात येतील. याबाबतचे सर्व निर्णय, अधिकार बँकेने राखून ठेवलेले असतील. तसेच भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबवणे अथवा रद्द करण्याचे अधिकार सुद्धा बँकेकडे राखून ठेवलेले आहेत.
अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून मेडिकल वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवार चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या शाखेमध्ये बँक सेवानियमानुसार नियुक्ती देण्यात येईल. नियुक्तीच्या ठिकणी उमेदवारास 10 दिवसाच्या आत रुजू होणे अनिवार्य राहील.
ऑनलाइन परीक्षा शुल्क : ऑनलाईन परीक्षा करता रुपये 560.50 शुल्क आकारले जाईल. सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 19 ऑक्टोबर 2024 आहे.
District Central Cooperative Bank Bharti 2024 : District Central Co-operative Bank is inviting online applications in the prescribed format from the eligible candidates residing in Maharashtra state for direct service recruitment of 0261 Class III Clerk Vacancy and IV Class Constable Vacancy 097 posts for Banks