Site icon

Bank Job : बंपर भरती!! सरकारी बँकेत 600 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Bank Job : बंपर भरती!! सरकारी बँकेत 600 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Bank of Maharashtra Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही सरकारी क्षेत्रातील आघाडीची 2000 हुन अधिक ब्रांचेस असलेली बँक आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती सुरू आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ज्या पदांच्या जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी PDF काळजीपूर्वक वाचा अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक खाली दिलेली आहे.

PDF जाहिरात  :  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

या भरती साठी वयोमर्यादा किती असणार? शिक्षणाची पात्रता काय असेल? अर्ज कशाप्रकारे करायचा. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

अधिकृत जाहिरात : बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

एकूण पदसंख्या : या भरती मार्फत 600 पदाची भरती केली जाणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील

वयाची अट : 20 ते 28 वर्ष

अर्ज शुल्क :
UR/EWS/OBC/ : 150 रु + GST
SC/ST : 100 रु + GST

पदाचे नाव : अप्रेंटिस (शिकाऊ)

शैक्षणिक पात्रता : शासनाने मंजूर केलेल्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून कोणत्याही शाखेतील पदवी झालेली असावी.

उमेदवारांनी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे स्थानिक भाषेत वाचन लेखन आणि बोलणे यामध्ये पारंगत असावे.

शिकाऊ उमेदवाराकडे दहावी किंवा बारावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र असणे अनिवार्य राहील.

त्याच राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक भाषा यायला हवी.

अप्रेंटिस वेतन : 9000 रुपये

काम करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पूर्णपणे झाल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंट घ्यावी.

ऑनलाइन केलेल्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे आवश्यक शुल्कासह अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल व प्रत्येक टप्प्यावर त्यांची पात्रता निश्चित केली जाईल.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज केला पाहिजे.

जर काही कारणास्तव उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकले नाही तर बँक ऑफ महाराष्ट्रची कुठली जबाबदारी राहणार नाही.

उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज करू नये. एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास शेवटी केलेला अर्ज वैध ठरविण्यात येईल व इतर भरलेल्या शुल्का सहित इतर अर्ज रद्द केले जातील.

पात्रते संबंधित जन्म तारखेचा पुरावा साठी मूळ कागदपत्र लग्नाच्या पडताळणीसाठी सादर करावेत. पडताळणीसाठी मूळ कागदपत्र आणल्याशिवाय उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात येईल.

उमेदवारांना माहिती देणे घेण्यासाठी ई-मेलचा पर्याय ठेवलेला आहे.

अर्ज स्वीकाराचे शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकता.

अधिक माहितीसाठी PDF वाचा.

Exit mobile version