New Government Scheme : बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे महाराष्ट्र राज्यामधील कामगार हे गरीब आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत आणि ते कमी पगारावर काम करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब असते. त्यांची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे विवाहाचा खर्च झेपवत नाही.
अशा वेळेसच बांधकाम कामगारांचे विवाह हे चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत आणि त्यांना पैशाची आर्थिक अडचण होऊ नये तसेच लग्नविधी व्यवस्थित पार पडावे. त्यांना पैशासाठी कोणत्याही सावकाराकडे हात पसरावे लागू नयेत. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार मंडळातर्फे राज्यातील सर्व नोंदणीकृत कामगारांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी मदत म्हणून विवाहाच्या खर्चाच्या साठी 30000 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाने घेतला आहे.
लग्न करण्यासाठी कामगारांना पैशांच्या कमतरतेमुळे लग्नाच्या वेळेस अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जमीन विकून, सोन्याचे दागिने विकून किंवा कर्ज काढून लग्नसाठी पैसे उभारावे लागतात. त्यामुळे ही बाब डोळ्यासमोर ठेवून शासनाने बांधकाम कामगारांसाठी विवाह योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत मजुरांच्या पहिल्या लग्नाच्या खर्चासाठी 30000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि प्राप्त झालेली रक्कम ही लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे.
हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी :
१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार मध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे.
२) अर्ज करणाऱ्या कामगाराची नोंद ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे झालेली असावी.
३) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
४) अर्जदाराचे उत्पन्न हे 6 लाखाच्या आत मध्ये म्हणजेच उत्पन्न कमी असावे.
५) ही आर्थिक मदत बांधकाम कामगाराच्या पहिल्या लग्नासाठी दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
१) आधार कार्ड (Aadhar Card)
२) पॅन कार्ड (Pan Card)
३) रहिवासी दाखला (Domicile Certificate)
४) मोबाईल नंबर (Mobile Number)
५) ईमेल आयडी (Email-id)
६) पासपोर्ट साईझचे तीन फोटो (Passport Size Photo)
७) स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Affidavit)
८) विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate)
९) ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
१०) पत्याचा पुरावा
११) प्रथम विवाहाचे प्रमाणपत्र
१२) बँक पासबुक झेरॉक्स
१३) नोंदणी अर्ज
१४) काम करत असलेल्या ठिकाणाचा पत्ता
१५) ग्रामपंचायत कडून मिळालेले बांधकाम कामगार प्रमाणपत्र
१६) शाळा सोडल्याचा दाखला
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा :
सर्वात आधी तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. नंतर फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन, प्रिंट आऊट घेतल्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये विचारलेली माहिती सर्व काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स अर्जा सोबत जोडव्या लागतील. बांधकाम कामगार महिला विवाह योजना अर्ज भरल्यानंतर आणि सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रति जोडल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज काळजीपूर्वक तपासावा लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जवळच्या बांधकाम कामगार आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज नोंदवावा लागणार आहे. अशा प्रकारे बांधकाम कामगार महिला विवाह योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.