Tar Kumpan Yojana 2024 :महाराष्ट्र शासनाकडून तार कुंपण अनुदान योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेताभोवती वन्य प्राणी किंवा पाळीव प्राणी यांपासून आपल्या पिकांचे रक्षण करता यावे यासाठी तार कुंपण अनुदान योजना आणली गेली आहे. या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकणार आहेत? अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने करू शकणार आहोत का? अर्ज कसा करायचा? यासाठी कोणती कागदपत्र लागतील? यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील? या योजनेच्या अटी व शर्ती काय असतील? ही सर्व माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तार कुंपण योजना थोडक्यात माहिती : महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे नेहमीच देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना आणत असते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असल्यामुळे शेतकऱ्याने जर धान्य पिकवले तरच देशातील जनता ही पोटभर अन्न खाऊ शकते. म्हणूनच राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेहमी शेतकरी संरक्षित राहावा म्हणून प्रयत्न करत असते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. तार कुंपण योजना असे या योजनेचे नाव आहे.
तार कुंपण योजना उद्देश : महाराष्ट्र राज्य सरकारकडून डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वनविकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवण्यात आलेली आहे. जंगली आणि पाळीव प्राणी यांपासून आपल्या शेतीचे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते. परंतु हे लोखंडी कुंपण लावणे शेतकऱ्याला महागडे असल्यामुळे परवडत नाही. शेतकरी शेतातील त्यांच्या मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून तार कुंपण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारकडून शेतीसाठी लोखंडी तार कुंपण बांधण्यासाठी 90 टक्के अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकरी शेतातील मालाचे जंगली जनावरांपासून आणि वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करू शकतात. त्यामुळे पिकांचे नुकसान हे टळू शकते.
तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्थी :
१) ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण केलेले नसावे.
२) शेतकऱ्यांनी निवडलेले शेती जमिनीची क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.
३) शेतकऱ्याला जमिनीचा वापर प्रकार हा पुढील दहा वर्षांसाठी बदलता येणार नाही. असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
४) शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचे ग्राम परिस्थिती समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा.
५) त्याचप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे.
६) तार कुंपण योजनेच्या अंतर्गत दोन क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90% अनुदानावर शेतकऱ्यांना पुरविण्यात येतील.
७) तसेच उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.
तार कुंपण योजना पात्रता :
१) या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२) कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे.
३) या आधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तार कुंपण योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती किंवा शेतकरी अर्ज करण्यास पात्र असेल.
४) अर्जदाराकडे आपल्या जमिनीची सर्व कागदपत्र असणे अनिवार्य राहील.
५) अर्जदाराने वनविभागाचे प्रमाणपत्र घेतलेले आवश्यक राहील.
तार कुंपण योजनेचे उद्दिष्ट :
१) या योजनेमुळे शेतकऱ्यांवर होणारे रात्रीच्या वेळीचे वन्य प्राण्यांचे हल्ले थांबवता येणार आहे. हे मुख्य उद्दिष्ट सरकारचे आहे.
२) शेतकऱ्यांनी आपल्या शेताभोवती कुंपण केल्यास शेती पिकाचे नुकसान होणार नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांन जे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे हे होणारे नुकसान त्यांना थांबवता येणार आहे.
३) या कुंपणामुळे शेतकऱ्यांची पिके चांगली होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल. शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले रोखता येणार आहे. हे या योजनेमध्ये उद्दिष्ट आहे.
४) वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकात येऊन शेती मालाचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि शेतकरी जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा फवारा देखील करतात. जेणेकरून शेत जमिनीचे वन्य प्राण्यांपासून नुकसान रोखता येईल.हे हे तार कुंपण योजनेमुळे कमी होईल आणि शेतकरी नैसर्गिक रित्या शेती करण्यावर भर देईल.
तार कुंपण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
१) आधार कार्ड (Aadhar Card)
२) रेशन कार्ड (Ration Card)
३) रहिवासी दाखला (Domicile Certificate)
४) अर्जदाराचा जमिनीचा सातबारा उतारा (7/12)
५) अर्जदाराचा जमिनीचा गट अ (8A)
६) मोबाईल नंबर (Mobile Number)
७) ईमेल आयडी (Email-id)
८) पासपोर्ट साईझचे दोन फोटो (Passport Size Photo)
९) स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Affidavit)
१०) जातीचा दाखला (Cast Certificate)
११) वनविभागाचे प्रमाणपत्र
१२) आपली शेतीची जमीन दहा वर्षाचे शेती साठीच वापरणार असल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र १३) ग्रामपंचायतचा दाखला
तार कुंपण योजना अर्ज कसा करावा :
तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार नाही. यासाठी सरकारने कुठल्याही प्रकारची वेबसाईट किंवा पोर्टल उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे या योजनेसाठी आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहोत. यासाठी आपल्याला आपल्याजवळील पंचायत समिती किंवा कृषी विभाग ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचा ऑफलाइन अर्ज भरून द्यायचा आहे.
१) तार कुंपण योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण ज्या भागात राहतो त्या भागातील कृषी केंद्र किंवा कृषी विभाग ऑफिसला आपल्याला जावे लागेल.
२) कृषी विभागाकडून आपल्याला तार कुंपण योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे.
३) अर्ज आपल्याला व्यवस्थित तपासून संपूर्ण भरायचा आहे.
४) अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती जसे की आपल्याला कुठल्या प्रकारचे कुंपण करायचे आहे त्यासाठी येणारा खर्च, नाव, पत्ता मोबाईल नंबर, हे सर्व गोष्टी व्यवस्थित भरायचे आहेत.
५) त्यानंतर आपल्याला अर्जा सोबत दिलेले सर्व प्रकारचे कागदपत्र व्यवस्थित जोडायचे आहे.
६) भरलेला अर्ज कृषी विभाग किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे.
७) आपण ज्या अधिकाऱ्याकडे अर्ज जमा करणार आहोत त्यांच्याकडून अर्ज भरून दिल्याची पोचपावती घ्यायची आहे.
८) अशा पद्धतीने आपण तार कुंपण योजनेसाठी अर्ज करू शकणार आहोत.