Pradhan Mantri Shram-Yogi Mandhan : कामगारांच्या खात्यात सरकार जमा करत आहे महिन्याला 3000 रुपये!! लाभ कुणाला? नोंदणी कुठे? अर्ज कसा करावा?
Pradhan Mantri Shram-Yogi Mandhan : केंद्रातील सरकारद्वारे महिला, सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, अशांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या गेल्या आहेत. त्यामधीलच एक असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना ज्यांचे उत्पन्न अतिशय कमी आणि भविष्याची काही सोय नाही अशा नागरिकांना, अशा कामगारांना मदत करण्यासाठी भारत सरकार ही योजना राबवत आहे. ती योजना म्हणजे (PM-SYM) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. (Hard Worker) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे मार्फत सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या म्हातारपणासाठी पेन्शन दिली जाणार आहे. या कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा करायचा? हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
PM-SYM असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या कामगारांचे महिन्याचे उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा जर कमी असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जवळपास 10 कोटी कामगार या क्षेत्रात काम करतात व त्यांना पुढील पाच वर्षासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून ठेवली आहे. पुढच्या पाच वर्षात ही योजना सर्वात मोठी पेन्शन देणारी योजना ठरणार आहे. आतापर्यंत 36 राज्यांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे. आजपर्यंत 46 लाख पेक्षा जास्त कामगारांनी या योजनेत भाग घेतला आहे. तसेच जगभरात याचे तीन लाखहुन अधिक संपर्क केंद्र आहेत.
असंघटित क्षेत्रात जवळपास 42 कोटींपेक्षा जास्त मजूर काम करतात. यामध्ये ट्रीटमेंट वर्कर, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमीहीन मजूर इत्यादी कामगारांचा समावेश आहे. वृद्धापकाळसाठी या सर्वांना सुरक्षा मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने श्रम योगी मानधन योजना आणली आहे. या आधी या सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणल्या गेल्या आहेत. त्यानंतर आता असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली गेली आहे. ज्या कामगारांचे उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा पेक्षा कमी आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇
आनंदाची बातमी!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!! शेवटची तारीख? अर्ज कुठे आणि कधीपर्यंत भरता येईल?
श्रम योगी मानधन योजना पात्रता :
केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी या मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी शर्ती निश्चित केल्या आहेत.
१) जे कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात फक्त त्यांनाच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. जसे की गवंडी, रिक्षा चालक, घरकाम करणारे, भाजीविक्रेते, सफाई कामगार, भट्टी कामगार,शिंपी, मोची.
असंघटित म्हणजे काय?? ज्या ज्या भागात रोज कमावण्याची आणि त्याच दिवशी खाण्याची व्यवस्था चालते. त्यांचा पगार निश्चित नसतो ज्यांना रजा किंवा पेन्शन नाही.
२) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमार्फत केवळ फक्त त्याच लोकांना लाभ होऊ शकतो ज्या कामगारांचे महिन्याचे उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी आहे. फक्त तेच लोक यांचे मासिक म्हणजेच महिन्याचे उत्पन्न 15000 पर्यंत आहे त्याच लोकांना प्रधानमंत्री मानधन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
३) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन या योजनेची महत्त्वाची पात्रता म्हणजेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी कामगाराचे बँक खाते हे आधार क्रमांकाची जोडलेले पाहिजे. ज्या कामगारांची बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
४) प्रधानमंत्री मानधन योजनेच्या लाभार्थी बचत खाते असणे आवश्यक राहील
५) प्रधानमंत्री श्रम योगी पेन्शन योजनेचा लाभ हा फक्त त्याच लोकांना मिळेल जे ईपीएफओ, एनपीएस, ईएसआयसी या योजनांचा लाभ घेत नसतील.
६) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमार्फत जे कामगार केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही मंत्रालयात किंवा विभागात कायमस्वरूपी किंवा कंत्राटी काम करत असतील तर त्यांना मिळणार नाही.
७) प्रधानमंत्री श्रम योजने अंतर्गत ज्या कामगारांनी आयकर भरला आहे किंवा त्यांच्या उत्पन्नावर कधी कर भरला असेल तर त्यांनाही असा कुठल्या प्रकारचा लाभ मिळणार नाही.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी कागदपत्र अनिवार्य :
१) आधार कार्ड
२) ओळखपत्र
३) बँक खाते पासबुक
४) लेबर कार्ड
५) मोबाईल क्रमांक
६) पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज कसा कराल :
१) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांनी त्यांच्या सर्व कागदपत्र सहित जवळच्या लोकसेवा केंद्रामध्ये जावे.
२) यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र सीएससी या अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतील.
३) त्यापुढे सीएससी अधिकारी तुमचा फॉर्म भरून घेईल आणि तुम्हाला फॉर्मची प्रत देईल.
४) ही प्रत तुम्हाला सांभाळून ठेवावी लागेल.
या योजनेसाठी या अटी राहतील :
१) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन या योजनेमार्फत महिन्याचे उत्पन्न हे 15000 पेक्षा कमी असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
२) या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते.
३) ही योजना ज्यांनी घेतली आहे त्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. 60 व पूर्ण झाल्यानंतर वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळेल.
जर त्यामध्येच पेन्शन घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर 50% रक्कम ही जोडीदाराला म्हणजेच पत्नीला मिळेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी प्रीमियम किती भरावा लागेल :
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयानुसार प्रीमियम भरावा लागणार आहे. महिन्याला 55 रुपयापासून ते 200 रुपये पर्यंत प्रीमियम द्यावा लागेल. तुम्ही जेवढी जास्त रक्कम या योजनेमध्ये द्याल तेवढीच रक्कम केंद्र सरकारकडून त्या योजनेत टाकली जाणार आहे. जर का तुम्ही तुमच्या वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना घेतली तर तुम्हाला महिन्याला 55 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. त्या बदल्यात तुम्हाला 60 वयापासून 3000 रुपये पेन्शन मिळेल. 30 वर्षाच्या व्यक्तींना त्याच्या 60 व्या वयापासून 3000 रुपये पेन्शनसाठी 100 रुपये भरावे लागतील आणि 40 वर्षाच्या व्यक्तींना 3000 रुपये पेन्शनसाठी 200 रुपये द्यावे लागतील. एवढीच रक्कम सरकारकडून तुमच्या पेन्शन खात्यामध्ये जमा केले जाईल.
1 thought on “PM-SYM : कामगारांच्या खात्यात सरकार जमा करत आहे महिन्याला 3000 रुपये!! लाभ कुणाला? नोंदणी कुठे? अर्ज कसा करावा?”