New Scheme for Senior Citizens : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 3000 रुपये वृद्धांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! येथे तुमचे नाव तपासा!
New Scheme for Senior Citizens : महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या गेल्या आहेत. सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. ही योजना राज्य सरकारकडून काही दिवसा आधीच आणली गेली आहे. या योजनेमधून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला गेला. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँकेमध्ये सहा हफ्त्यांचे पैसे देखील आलेले आहेत. आता महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष 65 व ज्येष्ठ नागरिकांसाठी महायुती सरकारकडून (Mukhyamantri Vayoshri Yojana 2024)मुख्यमंत्री वयोश्री योजना आणली आहे. या योजनेचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूर येथून करण्यात आले.
वयोश्री योजना नेमकी काय आहे :
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे रोजचे जीवन हे व्यवस्थित जगता यावे. ज्येष्ठ नागरिकांना या पैशातून त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करता याव्यात. तसेच त्यांना या पैशातून चष्मा, श्रवण यंत्र, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची इत्यादी गोष्टी खरेदी करता याव्यात. तसेच मन स्वस्थ केंद्र इत्यादी शिबिरांमध्ये त्यांना सहभागी होता यावे. असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. याची सुरुवात कोल्हापूर मधून मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाली.
Financial Aid for Senior Citizens : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून जवळपास 17 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या 40 हजार 220 लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच डीबीटी द्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 3000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात दिली.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3000 रुपये देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळेल? त्याच्यासाठी अटी शर्थी काय असतील? या योजनेची पात्रता काय असेल? ऑनलाईन अर्ज कसा करावा? हे सविस्तर जाणून घ्या.
हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇
New Driving Rules : नियमांत बदल!! दुचाकीस्वारांना भरावा लागणार दंड 7 ऑक्टोबर पासून नवीन कायदा लागू
योजनेचा लाभ कोणाला मिळेल :
१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
२) या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे.
३) बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असावे.
४) लाभ घेणाऱ्या व्यक्ती कडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असणे अनिवार्य आहे.
५) आधार कार्ड नसल्यास स्वतःची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. आधार कार्ड नसल्यास आधार कार्डची पावती देखील चालणार आहे
६) एकूण लाभार्थी संख्येपैकी 30% महिला राहतील.
७) केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या इतर कुठल्या योजनेचा रुपये 1500 जास्त लाभ घेतलेला नसावा
८) या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करता येणार आहे.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक :
१) आधार कार्ड (आधार कार्ड नसल्यास आधार कार्डची पावती देखील चालणार आहे)
२) राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
३) दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
४) स्वयंघोषणापत्र
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा कराल :
१) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
२) ऑफलाईन अर्ज करण्यासाठी : ज्या लोकांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी आपल्या जवळच्या तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज करावा.
३) ऑफलाइन अर्ज भरताना तुम्हाला अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवावा लागेल. अर्जामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहाव लागेल तुमचं वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा हे सर्व व्यवस्थित भरावे लागतील. या बरोबरच लिंग, जात आणि प्रवर्ग, मोबाईल नंबर, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत भरायचे आहे. आणि तुम्ही मागील तीन वर्षात सरकारी योजनेतून कुठल्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही असे स्वयंघोषणापत्र करून द्यायचे आहे हे सर्व पात्रतेसाठी आवश्यक आहे. अर्जामध्ये तशी जागा दिली आहे ती भरणे आवश्यक राहील. हा फॉर्म तुम्ही संपूर्ण भरून ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सुद्धा जमा करू शकता
४) आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करावीत. अर्जासोबत वर दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य राहील.
५) अर्ज भरल्यानंतर अर्ज सहित सर्व कागदपत्र तहसीलदार विभागाकडून तपासली जातील.
पात्र लाभार्थ्याची निवड केली जाईल व योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
2 thoughts on “मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 3000 रुपये वृद्धांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! येथे तुमचे नाव तपासा!”