Site icon

New Driving Rules : नियमांत बदल!! दुचाकीस्वारांना भरावा लागणार दंड 7 ऑक्टोबर पासून नवीन कायदा लागू

New Driving Rules : नियमांत बदल!! दुचाकीस्वारांना भरावा लागणार दंड 7 ऑक्टोबर पासून नवीन कायदा लागू

New Driving Rules : देशभरात टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकार मार्फत मोटर वाहन कायद्यामध्ये 2019 मध्ये अनेक बदल केले गेले होते. त्यानुसार अनेक नियम पाळावे लागतात. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया मार्फत एक माहिती दिली होती. (New Driving Rules Helmet) देशात टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवताना विशिष्ट नियमांचे पालन करणे अनिवार्य राहील. (Traffic rules) नियम न पाळल्यास कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होईल. या दंडात्मक कारवाई मध्ये दुचाकी चालकांना आता 20 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

Traffic Rules : भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यावर सुद्धा वाहनांची संख्या वाढली आहे त्यामुळे अपघातांचे सुद्धा प्रमाण वाढले आहे त्यामुळेच वाहन चालवण्यासाठी काही नियम आणि सुरक्षेचे उपाय व काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया.

हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇

मोठी घोषणा!! मोदी सरकारकडून सर्वांना मिळणार मोफत रेशन योजना काय? अटी शर्ती? जाणून घ्या

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे :

मोटर वाहन कायद्यानुसार 2019 मध्ये केल्या गेलेल्या बदलानुसार दुचाकी चालवताना चालकाने व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने या दोघांनीही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. हेल्मेट घातले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असे केंद्रीय मंत्री यांनी सांगितले.

चप्पल, लुंगी, बनियन घालून दुचाकी चालवता येणार नाही :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की लुंगी किंवा बनियन घालून दुचाकी चालवणे सुरक्षित नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतात. लुंगी व बनियन घालून जर दुचाकी चालवली तर अशा कपड्यांमध्ये अडकून अपघात होऊन मोठ्या दुखापतीची शक्यता राहील. तसेच चप्पल घालून जर दुचाकी चालवली तर गियर बदलताना किंवा ब्रेक मारताना चप्पल अडकवू शकते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहन चालवताना व्यवस्थित सॅंडल किंवा बूट घालणे आवश्यक राहील. अशा प्रकारची वेशभूषा जर ठेवली तर अपघात होण्याचे प्रमाण सुद्धा कमी राहील. जर कोणी लुंगी, बनियन, चप्पल घालून दुचाकी चालवलीच तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

सीटबेल्ट :

चारचाकी चालवताना सर्व चालकांनी सीट बेल्ट लावणे सक्तीचे आहे. हा नियम सर्वांनी पाळल्यास अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल.

वाहन चालवताना मोबाईलचा वापर :

वाहन चालवताना मोबाईलवर बोलले किंवा चॅटिंग करणे धोकादायक आहे. त्यामुळे वाहन चालवणाऱ्याचे लक्ष राहत नाही आणि अपघात होतात.

दारू पिऊन वाहन चालवणे :

दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघात घडतात. जर दारू पिऊन वाहन चालवले तर तुमचे लायसन रद्द केले जाईल व आपल्याला दंड होऊ शकतो.

सुरक्षित वाहन कसे चालवाल :

रस्त्यावर वाहन चालवण्याचे सर्व प्रकारचे नियम पाळा. सिग्नल तोडू नका.

वाहन चालवताना वेगाची मर्यादा लक्षात ठेवा. ओव्हरटेक करू नका.

वाहन चालताना संपूर्ण लक्ष रस्त्यावर आणि वाहन चालवण्यावर ठेवा. सुरक्षित अंतर ठेवा.

वाहनाच्या सर्व्हिसिंग कडे नेहमी लक्ष असू द्या. वाहनाचे ब्रेक, टायर, लाईट यांची तपासणी करत जा.

नेहमी चांगल्या प्रकारचे इंजिन ऑइल वापर आणि टायर मध्ये नेहमी बाहेर पडताना हवा चेक करत जा.

पावसाळ्यात धुके आणि इतर परिस्थिती पाहूनच बाहेर पडा.

फक्त स्वतःची सुरक्षा नाही तर इतरांच्या सुरक्षेसाठी वाहनांचे नियम पाळा. वाहन चालवण्याचे नियम पाळा हे सर्वांचे कर्तव्य आहे.

ऑक्टोबर पासून ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नवीन नियम :

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांचेकडून ड्रायव्हिंग लायसन बाबतच्या नियमाने मोठे बदल करण्यात आले आहे

खाजगी टू व्हीलर चालवायचे प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल कडे कमीत कमी एक एकर जमीन असायला पाहिजे.

चार चाकी वाहन चालवायचे प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल कडे कमीत कमी दोन एकर जमीन असायला पाहिजे.

त्याचप्रमाणे वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा ड्रायव्हिंग स्कूल कडे असायला पाहिजेत.

तसेच ड्रायव्हिंग स्कूल कडे प्रशिक्षकांचा हायस्कूल डिप्लोमा झालेला असणे गरजेचे असेल तसेच त्यांच्याकडे किमान पाच वर्ष वाहन चालवता येण्याचा अनुभव सुद्धा असायला हवा.

ड्रायव्हिंग स्कूल कडे बायोमेट्रिक आणि माहिती तंत्रज्ञान यामध्ये ज्ञान असणे आवश्यक राहील.

खाजगी प्रशिक्षण केंद्रांकडून मिळणार ड्रायव्हिंग परवाना :

ड्रायव्हिंग परवाना काढण्यासाठी वाहन चालवणाऱ्याला लेखी परीक्षा व दुचाकी किंवा चार चाकी चालवण्याची परीक्षा द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेसाठी जवळपास दोन ते तीन आठवडे लागतात. पण आता या सर्व प्रक्रियेपासून वाहन चालकाला दिलासा मिळणार आहे. त्याप्रमाणे आरटीओ मध्ये जाऊन लोकांना ड्रायव्हिंगची परीक्षा देण्याची गरज पडणार नाही. प्रशिक्षण केंद्रांना या परीक्षा घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लायसन मिळवणे हे अतिशय सोपे होणार आहे. या नियमामुळे वाहन चालकला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी ही प्रक्रिया ही सोपी होईल.

Exit mobile version