Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबेर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात
माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजने संदर्भात महायुती सरकार कडून अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितरित्या मिळतील अशी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत राज्यातील कोट्यावधी महिलांना राज्य सरकार कडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे मदत केली जाते. महायुती सरकारने जुलै 2024 या महिन्यापासून या योजनेची सुरुवात केली. आजपर्यंत या योजनेचे एक, दोन, तीन हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. तिसरा हप्ता मिळाल्यानंतर चौथा हप्ता आता लवकरच मिळणार आहे त्याबाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील अडीच कोटींहून जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी दोन कोटी पेक्षा जास्त महिला या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थी महिलांच्या केवायसी केलेल्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. यामुळे सर्व राज्यात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित ऑक्टोबर महिन्यातच मिळणार???
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर सभेत सांगितले की भाऊबीज म्हणून राज्य सरकार तर्फे नोव्हेंबर या महिन्याचे 1500 रुपये ऑक्टोबर महिन्यातच देण्यात येतील. (Aditi Tatkare) म्हणजेच नवरात्र नंतर लगेच दसरा आणि दिवाळी सण आहे त्यामुळे या सणासुदीच्या काळात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना नोव्हेंबर व ऑक्टोबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर या महिन्यातच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे म्हणून ऑक्टोबर महिन्यात लाडक्या महिलांना एकूण 3000 रुपये चा चौथा हप्ता मिळणार आहे
पुढच्या तीन दिवसांतच चौथ्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होतील.
Mazi Ladki Bahin Yojana: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली त्याचवेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होतील हे सुद्धा सांगितले, त्यांनी म्हटल्यानुसार लवकरच म्हणजेच जवळपास 3 ते 4 दिवसात १० ऑक्टोबर 2024 पर्यंत महिलांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. सरकारकडून लाभार्थी महिलांना आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच का मिळणार?? जाणून घ्या
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणा केल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता हा लाभार्थी महिलांना ऑक्टोबर मध्येच मिळणार आहे या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे काही दिवसातच निवडणुका आहेत. पुढील काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होतील. या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात. अशा वेळेसच निवडणुका जाहीर झाल्यास आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे शासनाच्या योजना या त्या काळापुरत्या बंद केल्या जातात. याच कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे एकत्रित पैसे ऑक्टोबर मध्येच दिले जाणार आहे.
हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 4500 रुपयांचा सरसकट जमा लाभार्थी महिलांची यादी पुराव्यासहित तपासा.
सरकारचा ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश.
१) महिलांचे सक्षमीकरण करणे.
२) महिलांचे राहणीमान सुधारण्यास मदत करणे.
३) महिलांना आर्थिक लाभ देणे.
४) राज्यातील सर्व गोरगरीब महिला व मुलींना सुख सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या रोजगारात हातभार लावणे.
५) महिलांचे सामाजिक पुनर्वसन करणे.
६) महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे.
७) महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या मुलांच्या आरोग्यामध्ये व पोषणामध्ये सुधारणा करणे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी कोण कोणत्या महिला पात्र असतील.
१) अशा महिला ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत.
२) महाराष्ट्र राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या, विधवा आणि निराधार महिला आणि त्या कुटुंबातील एक अविवाहित महिला.
३) त्या महिलेचे किमान वय 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वयाचे 65 वर्ष पूर्ण.
४) या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक राहील.
५) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा पेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणत्या महिला अपात्र असतील.
१) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल.
२) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल.
३) ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल. तथापि रुपये अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी पात्र ठरतील.
४) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर.
५) महिलेच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर.
६) महिन्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य असतील तर.
७) ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन( ट्रॅक्टर सोडून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असतील तर
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.