Mukhyamantri Annapurna Yojana : मोफत गॅस सिलेंडर मिळणार!! पण लाडक्या बहिणींनो हे काम लवकर करा

Mukhyamantri Annapurna Yojana : मोफत गॅस सिलेंडर मिळणार!! पण लाडक्या बहिणींनो हे काम लवकर करा

Mukhyamantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिवाळी निमित्ताने एक मोठे गिफ्ट दिले जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिलांना (Free Gas Cylinder Yojana) वर्षाला तीन मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजने अंतर्गत महिलांना एका वर्षात 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. आणि त्यासाठी त्या महिलेच्या नावावर गॅस जोडणी असायला हवी अशी अट सुद्धा घालण्यात आली होती. तसेच केंद्र सरकारच्या वतीने चालू असलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या जवळपास 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मिळणार आहे. आणि महिन्याला एकाहून अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाही अशी सुद्धा अट टाकण्यात आलेली आहे.

                                                                        हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇

आताची सर्वात मोठी बातमी!!! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी मोठी घोषणा

 Free Gas Cylinder For Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना घरगुती 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. परंतु ही योजना सरसकट सर्व महिलांना लागू होणार नाही. या योजनेसाठी काही नियम व अटी आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 52 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचे समजते. महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र शासनाचा 2024 – 25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधून मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात महिलांसाठी सुद्धा अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा केल्या गेल्या. महाराष्ट्र राज्यामध्ये गॅस सिलेंडर हा मोठा चर्चेचा विषय असतो. त्या अनुषंगाने महायुती सरकारने गरीब कुटुंबाला वर्षाला जवळपास 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना घरगुती 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील

केंद्रातील सरकार मार्फत 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली गेली होती. या योजनेचा उद्देशात होता की महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांना त्यांचे जीवन धूर मुक्त स्वच्छ वातावरणात जगता येईल, त्यांना स्वयंपाकासाठी इंधन पुरवणे हा होता. महाराष्ट्रामध्ये सध्या प्रधानमंत्री उज्वला या योजनेमार्फत गॅस कनेक्शन घेतलेले व या योजनेत न बसलेले पण गरीब प्रवर्गातील लाभार्थ्यांना गॅस घेणे परवडत नसल्याने हे वृक्ष तोड करून पर्यावरणाला हानी पोचवत आहेत. हे शासनाला समजले त्यामुळेच महाराष्ट्र शासनाकडून अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने बद्दल घोषणा केली गेली.

ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडरची जोडणी असेल त्याच लाभार्थी महिलांना तीन सिलेंडर वर्षाला मोफत मिळतील. अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जी अट घालण्यात आली होती. ती आता बदलण्यात आली असून लाडक्या बहीण योजनेच्या महिलांना सुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील इतर सदस्याचे नावावर जर गॅस जोडणी असेल तर लाभार्थी महिलेचे नावावर ती गॅस जोडणी करावी लागणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजने प्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. त्या योजनेमार्फत या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी आहे अशांनाच याचा फायदा मिळणार आहे आणि गरीब सामान्य महिला या योजनेपासून वंचित राहतील अशी अनेकांना वाटत होते परंतु राज्य सरकारने योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहे. अनेक घरांमध्ये या जोडणी पुरुषांच्या नावावर असतात आणि त्यामुळे अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असूनही महिलांना अनुदान देण्यात अडचण होत होती. राज्य सरकारने आधीच्या निर्णयामध्ये बदल करून सुधारित निर्णय घेतला आहे. आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावाने असलेली गॅस जोडणी महिलेच्या नावावर केल्यास त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेमार्फत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील. आणि याचा राज्यातील अनेक महिलांना लाभ होणार आहे.

                                                                        हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 3000 रुपये वृद्धांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! येथे तुमचे नाव तपासा!

उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी या पात्रता पूर्ण असणे अनिवार्य :

१) एकाच कुटुंबातून एकच अर्ज करता येईल. कुटुंबातून फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळेल.

२) आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

३) लाभार्थी महिलेच्या नावाने बँक खाते असणे अनिवार्य आहे.

४) लाभार्थी महिलेकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.

५) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणे अनिवार्य राहील.

६) लाभार्थी महिला दारिद्र रेषेखालील कुटुंबातील असावी तरच ती या योजनेसाठी पात्र राहील.

७) प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत ज्या महिलांना या आधीच गॅस कनेक्शन मिळाले आहे त्या सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील.

ऑनलाइन अर्ज असा करा :

१) अधिकृत वेबसाईटवर जा.

२) तीन मोफत गॅस सिलेंडर या योजनेवर किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेवर क्लिक करा.

३) नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करा.

४) आवश्यक ती सर्व माहिती नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी भरा.

५) आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स अपलोड करा.

६) फॉर्म सबमिट करा आणि त्याची पावती मिळवा.

ऑफलाइन अर्ज असा करा :

१) तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी ऑफिसला जा.

२) अर्ज घ्या आणि त्यात आवश्यक माहिती नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आधार नंबर इत्यादी सर्व भरा.

३) आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडा.

४) भरलेला फॉर्म गॅस एजन्सीकडे जमा करा. फॉर्म भरण्याची पावती घ्या.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र :

१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) बँक पासबुक
४) पॅन कार्ड
५) पासपोर्ट साईज फोटो
६) उत्पन्नाचा दाखला
७) रहिवासी दाखला

Leave a Reply