Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 4500 रुपयांचा सरसकट जमा लाभार्थी महिलांची यादी पुराव्यासहित तपासा
Aditi Tatkare: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत राज्य सरकार राजकारण करत आहे असे विरोधक म्हणत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण या योजने संदर्भात काही नवीन माहिती येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत ही दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु ज्या लाभार्थी महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज 30 सप्टेंबरच्या आधी अंगणवाडी सेविका यांचे कडून त्यांचे अर्ज मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु 4500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये कुठल्या दिवशी जमा होतील??? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जुलै 2024 या वर्षांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. त्याचवेळी अनेक महिलांनी अपूर्ण कागदपत्र जमा केलेले होते. सुरुवातीला अर्ज करण्यासाठी 31 जुलैची शेवटची तारीख दिली होती, परंतु बऱ्याच महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आलेले नव्हते. त्यामुळे अनेक महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागली होती. परंतु ज्या ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता व ज्या महिलांचा अर्ज ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला होता अशाच महिलांच्या बँक खात्यात आता सप्टेंबर 2024 या महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.
हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत यादी झाली जाहीर
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे एकत्र पैसे 4500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ज्या ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळालेले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे सर्व एकत्रित रक्कम मिळणार आहे. दिनांक 19 सप्टेंबर 2024 पर्यंत महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे परंतु याबाबत कुठल्याही प्रकारची सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही याची नोंद घ्यावी.
ज्या महिलांचे अर्ज भरणे बाकी आहे अशा नवीन अर्ज करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडून तो अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. मागील गेल्या काही दिवसात अनेक प्रकारचे घोटाळे या लाडकी बहीण योजनेमध्ये होत आहेत. त्याची अनेक प्रकरणे उजेडात आले होते. तसेच एका व्यक्तीने त्याच्याच पत्नीच्या नावावर जवळपास 30 अर्ज केल्याचे समजले होते त्या व्यक्तीने त्याच्या पत्नीचे नावे 30 अर्ज केले होते त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत असे गैरप्रकार टाळले पाहिजे याकरता महायुती राज्य सरकारने हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
याच महिलांना फक्त 1500 रुपये का मिळणार??
ज्या ज्या महिलांनी 30 सप्टेंबरच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज केला असेल त्या त्या महिलांना फक्त सप्टेंबर पासूनच पैसे मिळणार आहेत. त्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार नाहीत. त्याचप्रमाणे जर तुम्ही आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करत असाल तर आता अर्ज भरण्याचे जे अकरा पर्याय होते त्या अकरा पर्यायांपैकी फक्त एकच म्हणजे अंगणवाडी सेविका हा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जर तुम्ही हा पर्याय स्वीकारला नाही तर तुम्हाला अडचण येऊ शकते. कारण इतर सर्व पर्याय सरकारकडून बंद करण्यात आले आहेत. फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास अधिकृत करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन हप्त्यांचे एकूण 1 कोटी 59 लाख महिलांना 4787 कोटींचा लाभ देण्यात आलेला आहे. अशी माहिती महायुती सरकारने सांगितलेली आहे. आता हा आकडा सप्टेंबर या महिन्यात सुद्धा वाढण्याची शक्यता राहील.
बँक खात्यात या तारखेला पैसे येणार असल्याची शक्यता
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे तशी शक्यता आहे. सरकारकडून तशी कुठल्याही प्रकारची अजून अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु या दोन तारखेच्या आत मध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात किती पैसे जमा होणार??
ज्या ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेला असेल व त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला असेल अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 4500 हजार रुपये जमा होणार आहेत असे सरकारकडून सांगण्यात आले. कारण या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळे आता त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे एकत्रित मिळून पैसे मिळण्याचा अंदाज आहे.
1 thought on “Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 4500 रुपयांचा सरसकट जमा लाभार्थी महिलांची यादी पुराव्यासहित तपासा”