New Yojana : तुमच्या मुलींच्या खात्यात सरकार जमा करत आहे पाच हजार रुपये! लाडकी बहीण योजनेनंतर आली नवीन योजना! या ठिकाणी बघा अर्ज प्रक्रिया?

New Yojana : तुमच्या मुलींच्या खात्यात सरकार जमा करत आहे पाच हजार रुपये! लाडकी बहीण योजनेनंतर आली नवीन योजना! या ठिकाणी बघा अर्ज प्रक्रिया?

Lek Ladki Yojana : महाराष्ट्र सरकारच्या वतीने गरीब घरातील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना लेक लाडकी या योजनेअंतर्गत जन्मापासून ते मुलींच्या वय वर्ष 18 पर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ही योजना मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू केली गेली आहे. महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी फक्त मुलींसाठी आणली गेली आहे. लेक लाडकी ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या सर्व मुलींसाठी लागू राहणार आहे.(New Yojana) या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीच्या आई वडिलांनी मुलीचा जन्म झाल्यानंतरच लेक लाडकी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

New Yojana : आज महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या योजनेचे पात्र लाभार्थी महिलांना पैसे देखील मिळाले आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात काही महिलांना पैसे मिळाले नव्हते अशा पात्र महिलांना 3000 रुपये दिले गेले आहेत. तसेच या योजनेचे महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. पण राज्यातील मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत करणारी योजना लेक लाडकी अजून खूप जणांना माहितीच नाही. या योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. तर जाणून घ्या? ही योजना काय आहे? या योजनेसाठी काय अटी शर्ती आहेत?

हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇

आता तुमच्या मुलींच्या लग्नासाठी शिंदे सरकार देत आहे 20000 रुपये अर्ज प्रक्रिया? जाणून घ्या लाभ कुणाला? पात्रता काय?

लेक लाडकी या योजनेचे उद्दिष्ट :

महाराष्ट्र सरकारने दिनांक 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री या आधीच्या योजनेत सुधारणा करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी करण्यासाठी ही योजना सुरू केली. या अंतर्गत मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, कुपोषण कमी करणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, या योजनेअंतर्गत सरकारचे लक्ष प्रत्येक मुलीला आत्मनिर्भर बनवणे हे आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणती मुलगी शाळा सोडू नये यासाठी सरकार त्यांना शिक्षित करण्यासाठी शिक्षणात आर्थिक सहाय्य करत आहे. राज्यातील काही भागात अजूनही बालविवाह ही पद्धत सुरूच आहे. बालविवाह ही पद्धत बंद करण्यासाठी ही योजना मदतीची ठरू शकते. आता मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल व त्यांची स्वप्न त्या पूर्ण करू शकतील व त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक मदत मिळेल. त्यामुळे मुलींच्या भविष्याची चिंता देखील कमी होईल.

लेक लाडकी या योजनेचा लाभ कसा मिळेल??

१) मुलगी जेव्हा जन्माला येईल तेव्हापासूनच लेक लाडकी या बहिणीचा लाभ मिळणार आहे.

२) मुलीच्या जन्मानंतर लगेचच मुलीच्या आई-वडिलांनी ऑनलाईन अर्ज केल्यास 5000 रुपयांची आर्थिक मदत त्यांना मिळेल.

३) या योजनेसाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणारे सर्व कुटुंब पात्र ठरतील.

४) लेक लाडकी ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या सर्व मुलींना लागू राहील.

५) जर कुटुंब आर्थिक दृष्टीने दुर्बल असेल आणि त्यांना एक मुलीचा जन्म झाला असेल तर त्यांना पाच हजार रुपये आर्थिक मदत जन्माच्या वेळेस दिले जाणार आहे.

६) जेव्हा मुलगी इयत्ता पहिली जाईल तेव्हा 6000 रुपये दिले जातील.

७) ज्यावेळेस मुलगी सहावीत जाईल त्यावेळेस सात हजार रुपये दिले जातील.

८) ज्यावेळेस मुलगी अकरावीत जाईल त्यावेळेस आठ हजार रुपये दिले जातील.

९) आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला 75 हजार रुपये मिळणार आहेत असे सर्व एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येतील.

लेक लाडकी या योजनेच्या अटी शर्ती व पात्रता :

१) अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असेल.

२) या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच राहील.

३) लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असेल.

४) या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींसाठी असेल.

५) ही योजना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणारे कुटुंबामध्ये एक एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलीं पर्यंत लागू राहील. त्याचप्रमाणे एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

६) पहिल्या मुलीच्या वेळेस तिसरा हप्ता घेताना व दुसऱ्या मुलीच्या वेळेस दुसरा हप्ता घेताना आई वडिलांनी कुटुंब नियोजन सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक राहील.

७) दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर जुळे मुलं जन्माला आले आणि त्यातील एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळेल. परंतु त्यानंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करणे आवश्यक राहील.

८) 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा असेल आणि त्या नंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना योजना लागू राहील. मात्र आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील.

लेक लाडकी या योजनेसाठी ही कागदपत्र अनिवार्य :

१) लाभार्थी मुलीचा जन्म दाखला. २) कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न एक लाखाच्या आत) मध्ये असावे.
३) लाभार्थी मुलीचे आधार कार्ड (पहिल्या लाभच्या वेळेस ही अट शिथिल राहील)
४) (पालकांचे)आई-वडिलांचे आधार कार्ड.
५) पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
६) रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड झेरॉक्स प्रत.
७) मतदान ओळखपत्र.
८) संबंधित टप्प्यावरील लाभ घेण्यासाठी शिक्षण घेत असलेल्या संबंधी शाळेचा दाखला.
९) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सर्टिफिकेट.
१०) शेवटचा म्हणजे अठरा वर्षे पूर्ण झाल्याचा अंतिम लाभ घेण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.

लेक लाडकी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

लेक लाडकी या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.

अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्याने जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन लेक लाडकी या योजनेचा फॉर्म घ्यावा व फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरून कागदपत्र जोडून जमा करावा.

या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी या अंगणवाडी सेविका संबंधित पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची राहील.

अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची पडताळणी करून ऑनलाइन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. अर्जाची तपासणी झाल्यानंतर सर्व माहिती योग्य आढळल्यास योजना अंतर्गत पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.

1 thought on “New Yojana : तुमच्या मुलींच्या खात्यात सरकार जमा करत आहे पाच हजार रुपये! लाडकी बहीण योजनेनंतर आली नवीन योजना! या ठिकाणी बघा अर्ज प्रक्रिया?”

Leave a Reply