Ladki Bahin Yojana Update : निवडणूक आयोगाकडून लाडकी बहिणी योजना बंद करण्याबाबतचे सरकारला निर्देश
Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थी महिलांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. आजपर्यंत या योजनेमार्फत जवळपास 2 कोटी पेक्षा अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे दिले गेले आहेत. पण आता पुढील काळात निवडणुका असल्यामुळे पुढच्या हप्त्यांचे पैसे महिलांना मिळणार नाहीत. (Aditi Tatkare) त्यामुळे माझी लाडकी बहिण योजना थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच या योजनेचे नवीन अर्ज सुद्धा घेणे बंद केले गेले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकचा कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्यात मतदान होईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या सर्व आर्थिक योजना बंद झाल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या सूचना निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला दिल्या गेल्या आहेत. त्याप्रमाणे महिला आणि बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवण्यात आला आहे. निवडणुका होईपर्यंत माझी लाडकी या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळणार नाहीत. तसेच राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे एकत्रित पैसे दिले आहेत. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्याची आता लाडक्या बहिणींना वाट बघावी लागणार आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेला तात्पुरता ब्रेक लागणार आहे आणि (Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजना बंद झाली अशीच सर्वत्र चालू असतानाच महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहील :
Aditi Tatkare : जुलै 2024 पासून सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे ट्विट आदिती तटकरे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले गेले आहेत. राज्य सरकारने जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2024 या महिन्यासाठीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे .आणि 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचा हप्ता देखील महाराष्ट्र राज्यातील जवळपास 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिलांना दिला गेला आहे. सर्व पात्र लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या बातम्यांना किंवा माहितीला महाराष्ट्रातील महिलांनी बळी पडू नये ही नम्र विनंती.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवण्याचे कारण स्पष्ट :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या थांबवण्यात आली आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांवर आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा वापर होऊ नये अशी सूचना मुख्य निवडणूक आयोगाने केली आहे त्यानुसार राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत मतदारांवर आर्थिक प्रभाव पडता कामा नये. त्यामुळेच लाडकी बहिण योजना स्थगित करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयोगाकडून आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सर्व विभागाकडे याची विचारपूस केली. त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागा कडून सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ दिला गेल्याचं दिसत असल्याने महिला व बालविकास विभागाकडून या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. या विभागाने या योजनेसाठीचे वितरण चार दिवस आधीच थांबवल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती थांबवण्यात आली आहे असे स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षांकडून योजनादूत योजनेवर आक्षेप :
महाविकास आघाडीकडून योजनादूत या योजनेवर आक्षेप घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयोगाकडून या योजनेची तपासणीसाठी माहिती मागवली गेली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेनुसार प्रचार आणि प्रसिद्धी रोखण्यासाठी योजनांच्या कामांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता आर्थिक मोबदला सुद्धा मिळणार नाही.
2 कोटी 34 लाखहुन अधिक महिला या योजनेसाठी पात्र :
महायुती सरकारकडून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली गेली. या योजनेसाठी सरकारकडून 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आज पर्यंत राज्यामध्ये 2 कोटी 34 लाखहुन अधिक लाडक्या बहिणींच्या आधार लिंक खात्यामध्ये डीबीटी द्वारे ही रक्कम जमा केली गेली आहे. ज्या महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत आहे. अशा 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारकडून राबवली गेली आहे. आजपर्यंत पाच एकत्रित हप्त्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे असून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे सुद्धा दिवाळीच्या आधीच भाऊबीज म्हणून एकत्रित पैसे बँक खात्यामध्ये जमा केले आहेत.