Ladki Bahin Yojana : नियमात न बसता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जांची तपासणी व पैशांची वसुली होणार!!!
Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली. शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांनी घेतला आहे पण या योजनेत अनेक प्रकारचे गैरप्रकार झालेले दिसून येतात. (Recover Money from Bogus Beneficiaries) यामध्ये अनेक महिलांनी फसवणूक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची नोंदणी केली आहे. आतापर्यंत पुणे, सातारा सांगली, छत्रपती संभाजी नगर व नागपूर या ठिकाणाहून जवळपास 30 गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि या प्रकरणात संबंधित गुन्हेगारांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी खोटे कागदपत्र देऊन लाभ घेतला आहे. अशा महिलांच्या अर्जाची तपासणी ही होणार आहे. याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी होणार आहे असे समजते.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवण्यात आले आहे. लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थी महिलांची अर्जाची तपासणी होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी नियम मोडून या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या महिलांकडून महाराष्ट्र सरकार डिसेंबर महिन्यापासून वसुली सुरू करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. ही योजना ज्या महिला आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत अशा महिलांसाठी सुरू केली गेली होती मात्र याचा लाभ काही महिलांनी अटी व नियम मोडून घेतला आहे. अशा महिलांच्या अर्ज काही दिवसानंतर तपासले जाणार असल्याचे समजते. ज्या महिलांचे वय 21 ते 65 दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आणि याआधी सरकारच्या कुठल्याच योजनांचा लाभार्थी महिलांनी लाभ घेतलेला नाही अशा तिन्ही नियमांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून ही योजना आणली.
परंतु अनेक महिलांच्या नावाने एका पुरुषांने या योजनेचा लाभ घेतला. अनेक घरातील श्रीमंत महिला देखील या योजनेमध्ये पात्र ठरल्या आहेत असे दिसून आले आहे. आणि याची कबुली सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर सभेमध्ये दिली आहे. परंतु अर्जाची तपासणी करताना सर्व प्रकारची छाननी झाली असल्याने पुन्हा फेर तपासणी करण्याची गरज नसल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक महिलांनी आधार कार्डचा नंबर वापरून काही प्रकार केल्याचे उघडतेस आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्यातून लाखो तक्रारी प्राप्त झाल्या आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात.
फोटो आधार नंबर बदलून कागदपत्र जोडण्यात आली :
छत्रपती संभाजीनगर मध्ये एका पुरुषांने त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज भरून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या बँकांची खाते नंबर देऊन वेगळ्याच व्यक्तीचा आधार कार्डचा नंबर आणि फोटो बदलू कागदपत्रे जोडल्याचे निष्पन्न झाले होते.
नियम तोडून या योजनेचा लाभ घेणाऱ्या संबंधित महिलांकडून रक्कम वसूल करणार :
या योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली तरी कागदपत्राची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावे असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आले होते. नियम मोडून गैर प्रकारे या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून लाभ मिळालेली रक्कम सुद्धा वसूल करण्यात येईल.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे नियम तोडून लाभ घेण्याचे प्रकार उघडकीस आल्यावर महिला व बालविकास विभाग खडबडून जागा झाला आहे. चालू महिन्याच्या योजनेसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची कडक तपासणी करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला आहे. बोगस अर्ज केलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी मी योजनेच्या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा जाधव या महिलेच्या नावाने अनेक प्रकारचे आधार क्रमांक वापरून जवळपास 30 अर्ज केल्याचे समोर आले. प या महिलेने या अर्जांवर एकाच बँकेची माहिती भरलेली होती मात्र या खात्यात एकूण 3 हजार रुपये जमा झाले. तिने गुगलवर वेगवेगळ्या आधार क्रमांक ची माहिती मिळवून त्यांचा गैरवापर केला.
महिला व तिचा पती यांच्याबरोबर विरुद्ध वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यांना अटक सुद्धा होणार आहे.(Aditi Tatkare) महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर याची चौकशी केली व नियम व अटी तोडून त्यांनी अर्ज भरले होते त्यांचा प्रकार उघड झाला. महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार संबंधित विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सरकारी योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार आहे. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेमधून आधीच आर्थिक सहाय्य मिळते अशा महिलां अपात्र ठरतात अशा अपात्र महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून लाभ घेतल्याचे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून समोर आले आहे. म्हणून अशा अपात्र महिलांकडून पैसे वसूल केले जाणार आहे.