Free Flour Mill : सरकारकडून महिलांना फुकट पिठाची गिरणी वाटप! अर्ज प्रक्रिया! पात्रता! आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या सविस्तर!

Free Flour Mill : निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये आता आणखी एक म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना आणली गेली आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी आणि महिलांना सुद्धा माणसान मान सन्मान मिळावा यासाठी महायुती सरकारकडून अनेक आर्थिक लाभ देणाऱ्या योजना आणल्या जात आहेत. ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, सुकन्या समृद्धी योजना, मोफत शिलाई मशीन योजना, लेक लाडकी योजना, मातृवंदना तसेच पिंक रिक्षा योजना इत्यादी योजनांचा लाभ सध्या महिलांना देण्यात येत आहे त्यातच आता मोफत पिठाची गिरणी योजना 2024 आणली गेली आहे. (free flour mill Maharashtra online apply)

Free Flour Mill : मोफत पिठाची गिरणी ही योजना महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. पिठाची गिरणी ही प्रत्येक कुटुंबामध्ये दळण दळण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. अनेक महिला या ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना या मोफत पिठाच्या गिरणी योजनेअंतर्गत जर गिरणी मिळाली तर त्या अनेक प्रकारचे गृह उद्योग सुरू करू शकता. व स्वतःच्या पायावर उभे राहू शकता. ही पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी सरकारकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. महिलांना यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही. त्यामुळे महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरू करता येईल. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील महिला वर्गांना घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेच्या अटी व शर्थी काय असतील? यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागतील? ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा? योजनेसाठी पात्रता काय असेल? याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे माहिती शेवटपर्यंत वाचा.

१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे.

२) मोफत पिठाची गिरणी या योजनेचा ग्रामीण तसेच शहरी या दोन्ही भागातील महिलांना अर्ज करता येईल.

३) महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व महिलांना लाभ मिळणार आहे .पण ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

४) या योजनेसाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना पिठाची गिरणी 100% मोफत मिळणार आहे.

५) मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे किंवा मुलींचे वय हे 18 ते 60 वर्षे वयादरम्यान असले पाहिजे. 18 पेक्षा कमी वय असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा साठ वर्षे वयापेक्षा जर महिलेचा वय असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.

६) अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे.

७) अर्ज करणारी ही महिलाच असणे अनिवार्य आहे.

८) महिलेचा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असल्याचा जातीचा दाखला असणे अनिवार्य आहे.

९) दारिद्र रेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

१०) या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणी शासकीय कर्मचारी नसावेत.

११) कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

१२) कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने किंवा महिलेने हे आधी केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या अंतर्गत पिठाच्या गिरणीचा फायदा घेतलेला नसावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र :

१) अर्जदार महिलेचे आधार कार्ड २) रेशन कार्ड
३) उत्पन्नाचा दाखला
४) जातीचा दाखला
५) पिठाच्या गिरणीचे कोटेशन
६) रहिवासी दाखला
७) बँक पासबुक
८) मोबाईल नंबर
९) ईमेल आयडी
१०) लाईट बिल
११) पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
१२) महिला बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
१३) महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठ्याकडून घेतलेले उत्पन्न प्रमाणपत्र
१४) स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र

अर्ज करण्यासाठी कुठलीही ऑनलाईन पद्धत नाही त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा अर्ज करण्याची पद्धत :

महिला राहत असलेल्या जिल्ह्यामधील जिल्हा परिषद किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व बाल कल्याण विभागात तुम्हाला अर्ज करावा लागेल. या विभागातर्फे महिलांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. तसेच मोफत पिठाची गिरणी योजना देखील राबवली जात आहे. महिला व बाल विकास कार्यालयातून अर्ज घेतल्यानंतर तो अर्ज व्यवस्थित भरायचा आहे व त्यावर लिहिलेले सर्व कागदपत्र जोडून अर्ज हा त्या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून पोचपावती घ्यायची आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पिठाची गिरणी घेण्यासाठी अर्ज करू शकता.

1 thought on “Free Flour Mill : सरकारकडून महिलांना फुकट पिठाची गिरणी वाटप! अर्ज प्रक्रिया! पात्रता! आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या सविस्तर!”

Leave a Reply