Eknath Shinde : लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये मुख्यमंत्र्यांनी केल्या 10 मोठ्या घोषणा

Eknath Shinde : महाराष्ट्र शासनाकडून काही महिन्यांआधी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. (Maharashtra Assembly Elections 2024) महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांच्या घोषणा होण्याच्या पूर्वीच महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे आधी दिले. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये दिले गेले. (December Installment Vidhansabha Election 2024) आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वेळेस 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार अशा चर्चांना जोर आला आहे. (Ladki Bahin Yojana) असं खरंच होईल का?? सविस्तर जाणून घ्या?

  • महिलांना खरंच 1500 ऐवजी 2100 रूपये मिळणार?
  • CM शिंदे काय म्हणाले?
  • डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

कोल्हापूरच्या शिरोळ येथे झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदानावर आणि शुभेच्छांवर मी जिंकणार आहे. लाडकी बहीण सुपरहिट झालेली असून ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर मध्ये पैसे जमा होणार आहेत. ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Update) लाडकी बहीण या योजनेमुळे विरोधकांच्या छातीमध्ये धडकी भरली असून सावत्र भाऊ सुद्धा लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले होते. लाडक्या बहिनींना आम्ही पैसे दिले तर यात आम्ही काय पाप केलं?? आजपर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात आले आहे परंतु निवडणूकी नंतर जर पुन्हा आपलं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ केली जाईल आणि ते महिन्याला 2100 रुपये याप्रमाणे देण्यात येतील. अशी सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर मधील शिरोळ प्रचार सभेत बोलताना केली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी या सभेमध्ये दहा मोठ्या घोषणा केल्या.

हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇

Eknath Shinde : प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले माझे लाडकी बहिणींच्या बाबतीत मी बोलतो ते काय विरोधक करताय, कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली असून त्याच्यावर मी बोललो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो म्हणून लाडक्या बहिणींना आता 1500 वरून 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहे. महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलं आहे. महिला सुरक्षिततेसाठी 25 हजार महिलांना पोलीस भरती करण्याचा निर्णय सरकारकडून केला गेला आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री मोदींनी 6000 ते 12000 सन्मान योजना वर्षाला 15000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला असून त्याचबरोबर एम एस पी वर 20% अनुदान देण्याचा निर्णय देखील आमचे सरकार घेणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस म्हणाले.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आजची सभा खूप ऐतिहासिक आहे 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा या ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ केला होता आणि इतिहास घडवला होता. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी 23 तारखेला विजयाचा गुलाल पुन्हा इथे उधळायला येऊ. त्या आधी वचनाम्यातील 10 आश्वासन जनतेच्या समोर ठेवत आहे असे एकनाथ शिंदे ह्यांनी सांगितले.

१) वीज बिलामध्ये 30% कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार !

२) अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15000 रुपये आणि सुरक्षा विमा कवच. महिन्याला 15000 रु पगार आणि संरक्षण देणार !

३) 45,000 गावात पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पाणंद रस्ते बांधून देणार !

४) 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना रुपये 10 हजार देणार !

५) जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार !

६) वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये महिन्याला 1500 वरून 2100 रुपये देणार !

७) प्रत्येकास अन्न निवारा प्रत्येक गरिबाला अन्न निवारा देणार !

८)शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये प्रत्येक वर्षाला 12,000 हजार रुपये वरून 15,000 हजार रुपये देण्याची तसेच एम एस पी वर 20% अनुदान देणार!

९) लाडक्या बहिणींना 2100 रुपये. प्रत्येक महिन्याला 1500 वरून 2100 रुपये देणार ! महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करणार !

१०) सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र 2029 शंभर दिवसांच्या आत सादर करणार !

( Mukhyamantri Mazi Ladki Bahin yojana Mahayuti cm eknath shinde December installment Vidhansabha election 2024)

1 thought on “Eknath Shinde : लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये मुख्यमंत्र्यांनी केल्या 10 मोठ्या घोषणा”

Leave a Reply