Site icon

New Scheme : सरकारतर्फे नवीन योजना! अकरावी बारावी पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतके पैसे मिळणार!!!

Swadhar Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. (New Scheme) सरकारतर्फे नवीन योजना! अकरावी बारावी पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतके पैसे मिळणार!!!महाराष्ट्रातील विद्यार्थी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी यामध्ये नवबौद्ध व अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 60 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Swadhar Yojana : महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक वाढत असलेली शाळा महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या पटीमध्ये राज्यामध्ये सरकारी हॉस्टेलची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात आणि त्यामुळेच त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येतात. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतरचे शिक्षण घेता यावे यासाठी निवास भोजन व इतर शैक्षणिक खर्च हा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ही अनुदानाची रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य राहील. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत असेल.

हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇

सरकारकडून महिलांना फुकट पिठाची गिरणी वाटप! अर्ज प्रक्रिया! पात्रता! आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या सविस्तर!

१) अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरतील.

२) अर्ज करण्यासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी पात्र ठरतील.

३) अर्ज करण्यासाठी इयत्ता दहावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

४) अर्ज करण्यासाठी या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थी पात्र ठरतील. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल असे विद्यार्थी देखील पात्र ठरणार आहेत.

५) राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेच्या अंतर्गत निर्वाह भत्ता मिळवत नसलेला विद्यार्थी येथे पात्र ठरणार आहे.

६) शासनमान्य शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी येथे पात्र ठरेल.

१) व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी या शासकीय योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

२) या आधी शासनाच्या कोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ जर विद्यार्थी घेत असेल तर ते स्वाधार योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

१) अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

२) अर्ज करणारा विद्यार्थी हा नवबौद्ध व अनुसूचित जातीतील असणे अनिवार्य आहे.

३) या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना मिळेल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळणार नाही.

४) स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील जातीचा दाखला देणे बंधनकारक अनिवार्य राहील.

५) विद्यार्थी हा ज्या शहरात किंवा गावात शैक्षणिक संस्था असेल तेथीलच असेल तर त्या विद्यार्थ्याला याचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच विद्यार्थी स्थानिक शैक्षणिक संस्थेच्या ठिकाणचा रहिवासी नसावा.

६) इयत्ता अकरावी, बारावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास दहावीमध्ये कमीत कमी 60% गुण असणे आवश्यक राहील. इयत्ता बारावी नंतर दोन वर्षासाठी किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी मध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक राहील.

७) दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या कुठल्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी कमीत कमी 60 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात CGPA असणे अनिवार्य राहील.

८) इयत्ता बारावी नंतर पदवी पदवीका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी अभ्यासक्रमात दोन वर्षापेक्षा तसेच पदवीनंतर पदवी, पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा.

९) स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण राहील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान मर्यादा (टक्केवारीची) 50 टक्के राहील.

१०) अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा अधिक नसावे.

११) विद्यार्थी राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकाला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयामध्ये तसेच मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.

१२) जर विद्यार्थी हा त्याच्या घरापासून जवळच्या शिक्षण संस्थेत जर शिक्षण घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

१३) या विद्यार्थ्यांची निवड ही मेरीट नुसार करण्यात येईल निवडलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ते लाभ घेऊ शकतील.

१४) अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या एखाद्या सरकारी योजनेचा निर्वाह भत्ता योजनेचा या आधीच लाभ घेत असतील तर अशांना सुद्धा योजनेचा मिळणार नाही.

१५) विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीय बँक खात्याला जोडलेला पाहिजे.

१६) विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात राहत असल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

१७) विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावी व त्या पुढच्या दोन वर्ष कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.

१८) लाभार्थी विद्यार्थ्यांने जर शिक्षक अर्धवट सोडले तर त्याला या योजनेत मधून लगेच काढण्यात येईल.

१९) विद्यार्थ्याला प्रत्येक सत्र परीक्षा निकालाचे झेरॉक्स निकाल लागल्यापासून पंधरा दिवसांच्या आत कार्यालयामध्ये जमा करावी लागेल.

२०) या योजनेचा लाभ मंजूर झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60 टक्के किमान गुण मिळणे अनिवार्य राहील.

२१) अपूर्ण भरलेले अर्ज आणि आवश्‍यक कागदपत्र नसलेले अर्ज, अर्जात खोटी माहिती भरून दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

२२) विद्यार्थ्यांनी खोटी माहिती, खोटी कागदपत्र देऊन अर्ज केला असेल किंवा तसा प्रयत्न केला असेल जर शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास किंवा नोकरी व्यवसाय करत असल्यास इतर मार्गाने योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे जर निदर्शनास आले तर तो विद्यार्थी कारवाईस पात्र ठरेल आणि दिल्या गेल्या रकमेचे 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना : भोजन भत्ता (वार्षिक) 32,000 रुपये. निवासी भत्ता (वार्षिक) 20,000 रुपये. निर्वाह भत्ता (वार्षिक) 8,000 रुपये. एकूण (वार्षिक) 60,000 रुपये.

महसूल विभागीय शहरांनी त्याचबरोबर क वर्ग मनपा शहरांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : भोजन भत्ता (वार्षिक) 28,000 रुपये. निवासी भत्ता (वार्षिक) 15,000 रुपये. निर्वाह भत्ता (वार्षिक) 8,000 रुपये. एकूण (वार्षिक) 51,000 रुपये.

इतर शहरांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : भोजन भत्ता (वार्षिक) 25,0000 रुपये. निवासी भत्ता (वार्षिक) 12,000 रुपये. निर्वाह भत्ता (वार्षिक) 6000 रुपये. एकूण (वार्षिक) 43,000 रुपये.

या रकमेव व्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला पाच हजार रुपये व इतर शाखेत मध्ये अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी दोन हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी अतिरिक्त देण्यात येईल.

१)अर्जदार विद्यार्थ्यांचा फोटो २)अर्जदाराची सही
३)आधार कार्डची झेरॉक्स
४)जातीचा दाखला
५)बँक खाते उघडले असल्याचा पुरावा म्हणून बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा बँक स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक
६) तहसीलदारापेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकाऱ्या कडून मिळालेले उत्पन्न प्रमाणपत्र.
७) विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८) महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
९) बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असल्याचा पुरावा.
१०) शेवटच्या वर्गात शिकलेल्या वर्गाचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) ११) स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
१२) खानावळ, मेस यांच्या बिलाची पावती.
१३) उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला.
१४) मागील परीक्षेच्या निकालची झेरॉक्स.
१५) भाडे करारनामा
१६) हमीपत्र

स्वाधार योजनाही महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण विभागाकडून राबवली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना या योजनेचा अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी (www.sjsa.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर जाऊन तिथून अर्जाची PDF डाऊनलोड करून त्या PDF ची संपूर्ण झेरॉक्स काढावी व त्यात आवश्यक ती सर्व माहिती कागदपत्र जोडून तो अर्ज तुम्हाला जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन जमा करावा लागेल. अर्जाची पूर्तता होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

Exit mobile version