Mukhyamantri Baliraja Vij Savalat Yojna : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 नेमकी काय आहे योजना? 14 हजार कोटींचं अनुदान, 44 लाख शेतकऱ्यांना फायदालोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच या अर्थसंकल्पात आणखी एक मोठी योजना आणली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. जागतिक हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील अनियमितेमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर होणारा विपरीत परिणामापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून नेहमी प्रयत्न सुरू असतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य सरकारकडून दिनांक 25 जुलै 2024 रोजी शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना आणली गेली आहे. या योजनेसाठी 14 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या विजेचा भार शासनाने उचलण्याचं ठरवलं आहे. तसेच राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्तीच्या क्षमतेपर्यंतच्या सर्व शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज दिली जाणार आहे. यासाठी 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Mukhyamantri Baliraja Vij Savalat Yojna : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 नेमकी काय आहे योजना? 14 हजार कोटींचं अनुदान, 44 लाख शेतकऱ्यांना फायदा लोकसभा निवडणुकांनंतर ऊस, सोयाबीन आणि कांदा उत्पादन घेणार शेतकरी वर्ग शेतकरी महायुती सरकार वर नाराज झाल्याचे स्पष्ट झाले होते. विशेषतः उत्तम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी महायुतीला नापसंती दर्शवली होती. त्यामुळेच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांनी मोफत योजनेची घोषणा केली आहे. तर योजना नेमकी काय आहे? या मोफत वीज योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? ही योजना किती वर्षासाठी राहील? राज्यातील किती व कोणत्या शेतकऱ्यांचा फायदा मिळू शकतो? हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
नेमकी काय आहे मुख्यमंत्री मोफत वीज योजना?
Mukhyamantri Baliraja Vij Savalat Yojna : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 नेमकी काय आहे योजना? 14 हजार कोटींचं अनुदान, 44 लाख शेतकऱ्यांना फायदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 28 जून 2024 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनाची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा करताना अजित पवार म्हणाले भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असते. याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणाच्या बदलामुळे मोसमी हवामानात अनेक बदल झाले असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.
अशा अडचणीच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना येणाऱ्या विजेच्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले आहे. राज्यातील 44 लाख 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज दिली जाणार आहे. यासाठी 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यातील कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्रगार पद्धतीने करण्यात येते.
हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇
लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये मुख्यमंत्र्यांनी केल्या 10 मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना कालावधी :
Eknath Shinde : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज या योजनेच्या शासन निर्णयानुसार ही घोषणा जून महिन्यात आणली गेली असली तरी याची अंमलबजावणी मात्र एप्रिल 2024 पासून केली जाणार असल्याने, त्यामुळे मागच्या तीन महिन्याचे वीज बिल शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी या योजनेची घोषणा करण्यात आली असून एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत शेतकऱ्यांना मोफत योजना सुरू राहणार आहे. ही योजना सुरू झाल्यावर तीन वर्षांनी या योजनेचा कालावधी वाढविण्याबाबत सरकारकडून विचार करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील :
महाराष्ट्र राज्यातील 7.5 एच पी पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेच्या जीआर मध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की महाराष्ट्रामध्ये 47.41 लाख कृषी पंप ग्राहक आहेत. एकूण वीज ग्राहकांपैकी 16 टक्के ग्राहक हे कृषी पंपाचा वापर करतात या योजनेच्या जीआर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे एकूण कृषी पंप ग्राहकांपैकी 44 लाख 3 हजार शेतकरी हे 7.5 एचपी क्षमता असलेले कृषी पंप वापरत आहेत. या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. येथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 7.5 एच पी पंपासाठी हा निर्णय घेतला गेलेला नसून 7.5 एचपी पेक्षा कमी क्षमतेचे आणि 7.5 एच पी चे कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 7.5 एच पी पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप असतील त्यांना आम्ही मात्र वीज बिल भरावे लागणार आहे.