MSRTC Ticket Update : आताची सर्वात मोठी बातमी!!! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द!! सर्वसामान्यांना दिवाळीची भेट

MSRTC Ticket Update : आताची सर्वात मोठी बातमी!!! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द!! सर्वसामान्यांना दिवाळीची भेट

MSRTC Ticket Update : राज्य परिवहन महामंडळाला रोजच्या प्रवासी वाहतुकीमधून जवळपास 20 ते 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. तसेच दिवाळीमध्ये जी हंगामी १० टक्के भाडेवाढ केली जाते. त्यामुळे जवळपास पाच ते सहा कोटी रुपयांची त्यामध्ये भर पडत असते. आणि दिवाळीमध्ये त्या महिन्याचे महामंडळाचे उत्पन्न हे 800 ते 900 कोटी रुपयांच्या घरात जाते.

MSRTC Ticket Hike Cancelled : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच आचारसंहिता लागण्याआधी महाराष्ट्र सरकारकडून घोषणांचा पाऊस पडला जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकांमधून अनेक निर्णयांना मंजुरी दिला जात आहे. (ST Ticket Price Hike Cancelled) या आधीच मुंबईतील टोल वरचे लहान वाहनांचे टोल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला आहे.

दिवाळीमध्ये एसटी बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी बघता यावर्षी एसटी महामंडळाकडून जी 10 टक्के हंगामी भाडे वाढ केली होती ती आता रद्द केली गेली आहे. दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळातर्फे दर वर्षाला 10% हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय होतो. यावर्षी सुद्धा 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत एका महिन्यासाठी भाडे वाढ लागू झाली होती. परंतु राज्यात पुढील विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यातील जनता ही नाराज होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून ही भाडेवाढच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सर्वसामान्यांचा फायदा होणार आहे.

परंतु या दिवाळीच्या हंगामी भाडे वाढवण्याचा निर्णय रद्द केल्यामुळे आता महामंडळाच्या तिजोरीत या दिवाळीला अतिरिक्त रक्कम जमा होणार नाही. वाढ झाली असती तर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा एसटीचा प्रवासा महाग झाला असता परंतु या निर्णयामुळे आता त्यांना दिलासा मिळणार आहे.

                                                                           हे सुद्धा वाचा👇👇👇👇👇👇👇
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 3000 रुपये वृद्धांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! येथे तुमचे नाव तपासा!

कोणत्याच बसला भाडेवाढ नाही :

एसटी महामंडळाकडून जी 10 टक्के भाडेवाढ केले जाणार होती ती विठाई, शिवशाही, निमआराम या बससाठी लागू होणार होती, परंतु ती भाडेवाढ रद्द झाली आहे. मुंबई ते पुणे या मार्गावर शिवनेरी करता भाडेवाढ लागू करण्यात आली नव्हती असे महामंडळाकडून सांगण्यात आले होते.

सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा :

दिवाळीमध्ये सुट्टी असल्यामुळे अनेक जण आपल्या गावी किंवा पर्यटन स्थळी फिरण्यासाठी जातात. अनेक जण रेल्वेने प्रवास करतात तसेच परिवहन महामंडळाच्या एसटी बसने सुद्धा प्रवास करतात. दिवाळीला लागून सलग सुट्ट्या आल्यामुळे खूप जास्त गर्दी होणार आहे. या गर्दीचा फायदा घेऊन आणि खाजगी ट्रॅव्हल्स कडून मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात येते. तसेच प्रत्येक वर्षी एस टी महामंडळाकडून सुद्धा हंगामी 10 टक्के वाढ केली जाते. प्रवाशांचे गर्दी लक्षात घेता महामंडळ दरवर्षाला जास्तीच्या गाड्यांची घोषणा करते. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढत्या प्रवाशांचे संख्या पाहता उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळ ही भाडेवाढ करते. पण यावर्षी भाडेवाढ रद्द केली गेली आहे.

                                                                             हे सुद्धा वाचा👇👇👇👇👇👇👇                                                    New Driving Rules : नियमांत बदल!! दुचाकीस्वारांना भरावा लागणार दंड 7 ऑक्टोबर पासून नवीन कायदा लागू

1 thought on “MSRTC Ticket Update : आताची सर्वात मोठी बातमी!!! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द!! सर्वसामान्यांना दिवाळीची भेट”

Leave a Reply