मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत यादी झाली जाहीर.
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब व गरजू महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत आजपर्यंत दोन हप्त्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठवले गेले आहेत. तसेच तिसऱ्या हप्त्याचे पैसे सुद्धा पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेमध्ये अनेक ठिकाणी विविध गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव या तालुक्यामध्ये मनाठा येथेच सीएससी केंद्र चालकाकडून घोटाळा झाल्याचे उघडकीस झाले होते. नाव महिलांचे आणि आधार क्रमांक पुरुषांचे अशाप्रकारे नोंद करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज सबमिट केले होते. हे प्रकरण जेव्हा उजेडात आले त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी संबंधित अर्ज दारांची सर्व प्रकारची बँक खाते सील म्हणजेच गोठवण्यात आल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणेच एकूण जवळपास १८ खाते सील करण्यात आलेली आहेत.
जवळपास १८ बँक खाते सील केली गेली आदिती तटकरे यांनी माहिती दिली
महाराष्ट्रातील गोरगरीब व गरजू माता भगिनी, महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी या महायुती राज्य सरकारने प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने राबवविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा गैरव्यवहार करून बनावट मार्गाने लाभ मिळवण्याऱ्या जवळपास १६ पुरुषांचे तसेच या गैर व्यवहारात मदत करणाऱ्या व्यक्तींचे खाजगी आणि उद्योग बँक खाते गोठवले गेले आहेत. यापुढे सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या गोरगरीब महिलांच्या बाबतीत अशा प्रकारे अडचण आणणाऱ्या व्यक्तींवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल असे आदिती ताई ठाकरे म्हणाल्या.
नांदेड जिल्ह्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये नांदेड या जिल्ह्यातील हदगाव या तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालवणाऱ्याने केंद्र चालकाने गैरप्रकार केल्याचे सिद्ध झाले. सचिन मल्टी सर्विसेस नावाने गावातीलच सचिन थोरात हा तरुण ते सुविधा केंद्र चालवतो. त्याने अनेकांचे रोजगार हमी या योजनेसाठी कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. अर्जदारांच्या खात्यात जेव्हा रक्कम आली तेव्हा ते पैसे आपलेच असल्याचे दाखवून ते काढून घेतले होते. ही बाब समोर आली होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत या आधीच नवी मुंबई मधील महिलांच्या नावाने साताऱ्या मधील एका पुरुषाने आपल्या पत्नीचे फोटो वापरून अशा प्रकारे जवळपास ३० अर्ज केले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये असेच पुरुषांनी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमध्ये अर्ज केल्याची बाब उघडकीस आली होती.
Aditi Tatkare Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यांचे पैसे दिनांक १७ ऑगस्ट आणि दिनांक ३१ ऑगस्टला देण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने तिसऱ्या हप्त्याचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. तर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ज्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नसेल, त्या महिलांना आता यावेळेस तिन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे देण्यात येणार आहेत.
लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा होतील
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या ज्या महिलांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अर्ज भरले होते व अशा महिलांचे अर्ज 30 सप्टेंबर पूर्वी मंजूर होऊनही त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नसतील. अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा एकूण पाच महिन्यांचे एकूण 7500 रुपये जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आले आहे. ज्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे फक्त एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
१) या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज केलेला पाहिजे. २) आधार कार्ड
३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला आणि हे उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र
४) कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत) पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. ६) पासपोर्ट साईजचा फोटो.
६) रेशन कार्ड
७) या योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याचे हमीपत्र