Site icon

Cyclone Dana Alert : महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होणार! बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले! महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी!

Cyclone Dana Alert : महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होणार! बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले! महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी!

Cyclone Dana Alert : देशातील अनेक भागातून मान्सूनचा प्रवासा उलट्या दिशेने सुरू झाला आहे. परंतु हा परतीचा मान्सून महाराष्ट्रातच रेंगाळत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात शेतीचे व इतर नुकसान करत आहे आणि आता भारतीय हवामान खात्यातर्फे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (Cyclone Dana Update) बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाला दाना असे नाव दिले गेले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रावर पुन्हा अतिवृष्टीचे ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दाना या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेपासून ते दक्षिण भारत पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. दाना या चक्रीवादळा बाबत भारतीय हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे

अमेरिका आणि युरोपियन हवामानाकडून सांगितले गेले आहे की दाना चक्रीवादळ हे 24 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकेल. दक्षिण भारतात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नई, बंगलोर आणि अनेक शहरांमध्ये पुराचे पाणी साचल्यामुळे लोक हैराण झालेले आहेत. रस्ते आणि रहिवासी भागांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यावेळेस दिल्ली आणि उत्तर भारतातील हवामान बदलू शकते. या चक्रीवाचा सर्वात मोठा फटका भारत-बांगलादेश आणि म्यानमार यांना बसणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे.

Cyclone Dana Alert : तसेच सतत होणाऱ्या पावसामुळे द्विकल्पीय भारताची स्थिती अतिशय वाईट झालेली आहे. चेन्नईपासून ते बंगळूरपर्यंत आणि पांडेचेरी पासून तिरुअनंतपुरम पर्यंत जोरदार पाऊस होत आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये उत्तर तामिळनाडू, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि उडीसा मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो.

मागच्या 24 तासांमध्ये कुठे कुठे पाऊस झाला?? :

मागच्या 24 तासामध्ये आंध्रप्रदेश, उत्तर तामिळनाडूसह दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे की तामिळनाडू दक्षिण अंतर्गत कर्नाटक किनारी कर्नाटक आणि अंदमान निकोबारच्या बेटांच्या काही भागात मागच्या 24 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पूर्व किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये तसेच पश्चिम किनाऱ्यावरती आणि पश्चिम बंगालच्या गंगेच्या मैदानी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. ईशान्य भारत आणि झारखंड आणि बिहारच्या काही भागात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

पुढील 24 तासात या ठिकाणी पाऊस पडणार :

भारतीय हवामान खात्यातर्फे सांगितले की पुढील 24 तासांमध्ये रॉयल सीमा, उत्तर तामिळनाडू ,कर्नाटक आणि केरळमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडीसा, पश्चिम बंगाल झारखंडचा काहो भाग व कोकण आणि गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्यामध्ये पावसाची शक्यता राहील. सिक्कीम, ईशान्य भारत छत्तीसगडचा काही भाग, मध्य प्रदेश, उत्तराखंड, विदर्भ आणि दक्षिण गुजरात मध्ये सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील.

मच्छीमारांना भारतीय हवामाना खात्यातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे :

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे चक्रीवादळ भारतीय हद्दीतून अरबी समुद्रामध्ये पोहोचल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे अरबी समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असल्यामुळे मासेमारीसाठी इतर कारणासाठी जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version