DA Hike Announcement: कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी!!! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारने केली भरघोस वाढ

DA Hike Announcement: कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी!!! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारने केली भरघोस वाढ

Good News For  Employee: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांचेसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीप्रमाणे बुधवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ला मंत्रिमंडळ यांची विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत महागाई भत्ता (DA) वाढवण्या संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA) तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के भत्ता मिळत आहे हा सध्याचा महागाई भत्ता 50 टक्क्यांहुन 53 टक्क्यावर जाणार आहे. ही महागाई भत्त्याची वाढ 2024 पासून लागू असून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै पासून सप्टेंबर पर्यंत या तीन महिन्यांची तर थकबाकी सुद्धा देण्यात येणार असल्याचे समजते. केंद्र सरकार ऑक्टोबर या महिन्यांमध्ये घोषणा करू शकते मात्र डीएवाडी संदर्भात अशी कुठलीही अधिकृत माहिती अजून पर्यंत जाहीर केलेली नाही दिवाळीच्या जवळपास जाहीर होण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी 2023 ला ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये महागाई भत्ता मध्ये वाढ केल्याची घोषणा केली गेली होती

महागाई भत्यामध्ये जर वाढ झाली किंवा तसे जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना (DA) मिळण्यासोबतच मागच्या तीन महिन्यांची सुद्धा थकबाकी मिळेल. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाला महागाईची झळ सोसण्यास मदत करतो आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळतो. याआधी जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलेली होती. ज्यामुळे (DA) हा 50 टक्क्यांपर्यंत गेला होता. दरवर्षी वर्षातून दोनदा महागाई भत्ता मध्ये वाढ केली जाते. आता या दुसऱ्यांदा केलेल्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्याबरोबरच दिवाळीचा बोनस सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या पगारात येण्याची शक्यता आहे. (DA Announcement)

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शन घेणाऱ्यांना महागाई भत्तामध्ये वाढ मिळणार

7th Pay Commission: महागाई भत्त्याची वाढ हे ऑल इंडिया कंज्यूमर प्राईज इंडेक्स वर आधारलेली असते. जर समजा महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली तर ज्या कर्मचाऱ्यांना त्यांचे बेसिक वेतन 18 हजार रुपये आहे त्यांना महागाई भत्यात वाढ करून 9540 रुपये मिळणार आहेत. जर ही महागाई भत्त्याची वाढ चार टक्क्यांपर्यंत वाढवली तर त्यांना 9720 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

देशामध्ये जवळपास एक कोटी सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळू शकतो. जर ऑक्टोबर महिन्यात ही महागाई भत्त्याची वाढ झाली तर सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात त्यांना पैसे मिळणार आहेत.

सरकारचे आता सर्व लक्ष हे महागाई नियंत्रणात कशी येईल यावर आहे त्यासाठी महागाई भत्ता कसा वाढवता येईल यावर आणि आठवावेतन लागू करण्यावर सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांची आणि निवृत्ती पेन्शन धारकांची दिवाळी दसरा हा जोरावर होणार असल्याचे चित्र आहे. (8th Pay Commission)

                                                                 हे सुद्धा वाचा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबेर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरवात

महागाई भत्ता म्हणजे नेमकं काय??

(DA Hike Announcement) महागाई भत्ता म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजच्या खर्चावर महागाईची झळ पोचू नये म्हणून त्यांना देण्यात येणाऱ्या मूळ पगारावर त्यांच्या मूळ पगाराची टक्केवारी होय. ही वाढ दरवर्षी महागाईनुसार किंवा महागाईच्या बदलानुसार दर सहा महिन्याला केली जाते.

महागाई भत्ता (DA) वाढ म्हणजे काय??

(Dearness Allowance – DA) महागाई भत्ता म्हणजे महागाई वाढल्यानंतर वाढणाऱ्या रोजच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्यामध्ये वाढ. सरकारी ही वाढ दरवर्षी वर्षातून दोनदा जाहीर करत असते. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे वेतन 50 हजार रुपये असेल आणि त्याच कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 असेल तर कर्मचाऱ्याला 9000 रुपये महागाई भत्ता मिळतो. जो त्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 50% आहे.

आजपर्यंत सरकारने महागाई भत्ता वाढीची घोषणा ही दसरा दिवाळीच्या जवळपासच केली आहे. तर जानेवारी महिन्यासाठीची महागाई भत्त्याची वाढ बऱ्याच वेळेस होळी सणाच्या आसपास केली जाते.

महागाई भत्यामध्ये वाढ झाल्यास काय होते??

महागाई भत्यामध्ये वाढ झाल्यास रोज मिळणारा भत्ता, ज्याला आपण दैनंदिन भत्ता म्हणतो, घरभाडे भत्ता, ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा, वस्तीगृह अनुदान या संबंधित सर्व प्रकारचे भत्ते वाढतात. कारण हे भत्ते (DA) शी जोडलेले असल्याने डीए वाढला की ते सुध्दा वाढतात.

सध्याचा राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती आहे??

(Central Government) या अगोदर दिनांक 1 जानेवारी 2024 ला केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळेसच 42 टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2023 ला महागाई भत्ता वाढवला नाही. तसेच 23 नोव्हेंबर 2018 रोजी महागाई भत्ता वाढवला गेला होता तेव्हा तो 42% वरून 46% करण्यात आला होता.

1 thought on “DA Hike Announcement: कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी!!! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारने केली भरघोस वाढ”

Leave a Reply